शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ तिकिटाच्या किंवा इतर नियमात बदल नाही; रेल्वेचं स्पष्टीकरण

By admin | Updated: July 13, 2017 16:44 IST

इंडियन रेल्वे त्यांच्या तात्काळ तिकीटांच्या किंवा इतर कुठल्याही नियमांमध्ये बदल करत नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13-  इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे, असं वृत्त काही दिवसांपासून प्रसारीत होत होतं. पण इंडियन रेल्वे त्यांच्या तात्काळ तिकिटांच्या किंवा इतर कुठल्याही नियमांमध्ये बदल करत नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे. रेल्वेच्या नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होतील, अशा बातम्या येत आहेत. पण असे कोणतेही बदल होणार नसल्याचं रेल्वेने म्हंटलं आहे. कॅशलेश तिकीट विक्रीवर असणाऱ्या नियमांमध्येही बदल केले जाणार आहेत तसंच रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के पैसे प्रवाशांना रिफंड केले जातील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.  
 
"गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅफ ग्रुपमध्ये आणि काही वेबसाइट्सवर इंडियन रेल्वे नवे नियम लागू करणार असल्याची माहिती प्रसारीत होत असल्याचं निदर्शनास आलं. 1 जुलै 2017 पासून रेल्वे नवे नियम लागू करेल असंही बोललं जात होतं. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असं स्पष्टीकरण रेल्वेने 30 जून रोजी दिलं आहे.  तसंच तात्काळा तिकीट बुक करण्यासाठी आधीचेच नियम लागू असतील असंही रेल्वेने सांगितलं आहे.
 
तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने 2015मध्ये नियम बदलला होता. एसीचं तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी दहा वाजता आणि नॉन-एसीचं तिकीट बुकिग सकाळी अकरा वाजता सुरू होणार. प्रवासाच्या एक दिवस आधी प्रवाशाला तात्काळ तिकीट बूक करणं गरजेचं आहे. या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
 
तसंच तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकिटाचे पैसे परत मिळण्याच्या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकीटाचे पैसे प्रवाशाला परत मिळणार नाहीत. हा नियम आधीप्रमाणेच लागू आहे. 
 
तात्काळ ई-तिकीट बूक करताना प्रत्येक पीएनआरवर दराने जास्तीत जास्त चार प्रवाशांचं तिकीट बूक करता येइल. 
 
1 जुलै 2017 पासून कोणतेही नवे नियम नाहीत. फक्त इतर विभागांप्रमाणे रेल्वेही जीएसटीची 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे.
रेल्वेकडून वेटिंग तिकिटाची यादी ऑनलाइन तसंच रेल्वे स्टेशनवर जारी केली जाइल. या नियमातही बदल नसेल.