जमतही नाही अन् करमतही नाही
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
या जुळ्या भावांचे घरात अनेकदा एकमेकांशी जमत नाही. एकमेकांच्या खोड्या काढणे सुरुच असते. असे जरी असले तरी दोघांनाही एकमेकांशिवाय करमतही नाही. दोघांचा एकमेकांवर एवढा जीव आहे की कुठलीच गोष्ट एकमेकांशिवाय करीतच नाहीत.
जमतही नाही अन् करमतही नाही
या जुळ्या भावांचे घरात अनेकदा एकमेकांशी जमत नाही. एकमेकांच्या खोड्या काढणे सुरुच असते. असे जरी असले तरी दोघांनाही एकमेकांशिवाय करमतही नाही. दोघांचा एकमेकांवर एवढा जीव आहे की कुठलीच गोष्ट एकमेकांशिवाय करीतच नाहीत.पंढरपूर येथील घनश्याम सोसायटीमध्ये राहणारे व बालाजी कृषी विकास केंद्राचे मालक विलास शंकरराव पामे व वनिता पामे यांची वरद व वरुण ही जुळी मुले.७ ऑक्टोबर २००६ ही वरद व वरुण यांची जन्मतारीख. आदर्श प्राथमिक विद्यालय या शाळेत दोघेही इयत्ता चौथीमध्ये शिकतात.दोघांच्या दिसण्यात जसा फरक आहे, तसाच यांच्या स्वभावातही फरक आहे. वरद हा दिसायला जरी शांत असला तरी कुणालाही कळणार नाही, अशा बारीक खोड्या त्याच्या सुरुच असतात. वरुण सर्वांशी मनमिळावूपणे वागतो. पण त्याचा खोडकरपणा दिसून येतो. कराटे, स्केटिंग, सायकल, दोरीवरील उड्या, क्रिकेट हे यांचे आवडते खेळ. आजोबा शंकरराव सखाराम पामे व आत्या राजश्री जगलपुरे यांचे दोघेही खूप लाडके आहेत.संजय द. शिंदे६०व्या वर्षी जुळेचीनमधील शेन हेलिन या महिलेने ६०व्या वर्षी झीझी व हुईहुई या जुळ्या कन्यांना जन्म दिला. त्यांच्या एकुलत्या कन्येचा २९ व्या वर्षी विषबाधेने मृत्यू झाल्यानंतर या पती-पत्नीने अपत्याचा निर्णय घेतला. चीनमधील त्या सर्वात वयोवृध्द माता ठरल्या.