शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कारवाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:38 IST

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या आकड्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही अस्वस्थ केले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या आकड्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही अस्वस्थ केले आहे. सर्वोच्च न्यायालयाला मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील सहा महिन्यांत २४ हजार अल्पवयीनांवर बलात्कार झाले आहेत. यावर कारवाई होत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.न्यायालयीन आकडेवारीनुसार, १ जानेवारी २0१९ ते ३0 जून २0१९ या काळात अल्पवयीनांवरील बलात्कारप्रकरणी २४,२१२ एफआयआर दाखल झाले. कारवाई मात्र नगण्य प्रकरणातच झाली आहे.न्यायालयाप्रमाणेच विरोधकांनीही या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाशासित राज्यांत बलात्काराच्या घटना सर्वाधिक असून, याप्रकरणी संसद आणि संसदेबाहेर सरकारला घेरण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा नारा निरर्थक आहे, हे मुलींवरील अत्याचारांतून सिद्ध होते.प्रत्येक मुलीवर सरकार केवळ ५ पैसे खर्च करणार असेल, तर विकास कसा होणार? २0१६ च्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचे आकडे सरकार का लपवीत आहे? २0१६ पासून आतापर्यंत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची ९0 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.जेथे जेथे भाजपची सरकारे आहेत, तेथे तेथे महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना सर्वाधिक आहेत. तथापि, ही प्रकरणे दडपून टाकण्यात येत आहेत.>आकडे काय सांगतात?उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३,४५७ अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार झाले. यातील केवळ ११५ प्रकरणांत कारवाई झाली. म्हणजेच कारवाईचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. महाराष्ट्रात १,९४0 अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार झाले. कारवाई मात्र केवळ २४ प्रकरणांत झाली. कारवाईचे हे प्रमाण अवघे १ टक्का आहे. अनेक राज्यांत तर एकाही प्रकरणात कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. अशा राज्यांत कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा, केरळ, नागालँड अशा काही राज्यांचा समावेश आहे. पंजाबात ३४७ घटना घडल्या; तर २५ प्रकरणी कारवाई झाली. चंदीगडमध्ये २९ घटनांपैकी १२ प्रकरणांत कारवाई झाली.