शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
4
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
5
LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा
6
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
7
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
8
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
9
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
10
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
11
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
12
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
13
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
14
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
15
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
16
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
17
दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल
18
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
19
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

Gyanvapi Masjid: बाबरी मशिदीनंतर आणखी एक मशीद गमवायची नाही: ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 7:08 AM

सर्वेक्षणावर ओवेसी यांची प्रतिक्रिया. ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा आदेश देणारे वाराणसीतील स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत आहे.

हैदराबाद : ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा वाराणसीतील स्थानिक न्यायालयाने दिलेला आदेश हा प्रार्थनास्थळांसंदर्भातील १९९१च्या कायद्याचा भंग आहे. याआधी आम्ही बाबरी मशीद गमावली आहे. आणखी एक मशीद आम्हाला गमवायची नाही, अशी प्रतिक्रिया  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशाने भंग झाला आहे. या आदेशाविरोधात ऑल मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात लढा देईल, असा मला विश्वास आहे. ज्ञानवापी मशिदीचे सध्याचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तत्काळ एफआयआर दाखल केला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. 

न्यायाधीशांच्या सुरक्षेची चिंताज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा आदेश देणारे वाराणसीतील स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत आहे. या न्यायाधीशांनी सांगितले की, ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र या प्रकरणामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मी व कुटुंबीय सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेले आहोत. काल मी आईशी बोललो. तिलाही खूप काळजी लागली आहे.

टॅग्स :MosqueमशिदAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी