गोडसेचे छायाचित्र लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
नवी दिल्ली- नथुराम गोडसे यांच्या छायाचित्राला लावण्यावरून हिंदू महासभेच्या दोन गटात वाद निर्माण झाला. एका गटाने हे छायाचित्र लावण्यास परवानगी दिली जावी असे म्हटले असून दुसऱ्याने तसे केल्याने समाजात वैमनस्य निर्माण होऊन चुकीचा संदेश जाईल असे मत व्यक्त केले आहे.
गोडसेचे छायाचित्र लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद
नवी दिल्ली- नथुराम गोडसे यांच्या छायाचित्राला लावण्यावरून हिंदू महासभेच्या दोन गटात वाद निर्माण झाला. एका गटाने हे छायाचित्र लावण्यास परवानगी दिली जावी असे म्हटले असून दुसऱ्याने तसे केल्याने समाजात वैमनस्य निर्माण होऊन चुकीचा संदेश जाईल असे मत व्यक्त केले आहे.एका गटाचे अध्यक्ष असलेल्या स्वामी चक्रपाणी यांच्या मते त्यांचा गट हा खरा हिंदू महासभा आहे. त्यांनी अन्य गटाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांच्यावर गोडसेला प्रोत्साहन देण्याप्रकरणी टीका केली. त्यांनी हिंदू महासभा कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या वा राष्ट्रपित्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीच्या सार्वजनिक स्थळी होणाऱ्या सन्मानाच्या विरोधात आहे असे मत पुढे नोंदविले.