शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात ८२६ नवे रुग्ण, देशातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार ४२५

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:25 IST

महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले ८२६ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार ४२५ झाली आहे. एकूण ३७० जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाने गेल्या २४ तासांत २८ जण मरण पावले. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४४६ झाली आहे. मात्र आतापर्यंत १५०४ रुग्ण उपचारांमुळे बरेही झाले आहेत.महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजस्थानमध्ये ११०१, मध्य प्रदेशात १११५, तर गुजरातमध्ये ९७१ रुग्ण आहेत. तामिळनाडू आणि दिल्लीत १ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जगभर २१ लाख रुग्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा २१ लाख २९ हजारांवर गेला आहे आणि मृतांची संख्या १ लाख ४२ हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत ५ लाख २६ हजार रुग्ण बरेही झाले आहेत, तर ५१ हजार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिका (२८ हजार ७००), इटली (२१ हजार ६४५), स्पेन (१९ हजार १३०), फ्रान्स (१७ हजार २००) आणि ब्रिटन (१३ हजार ८००) या पाच देशांमध्येच सुमारे १ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगात ५३ देशांमध्ये ३३३६ भारतीयांना बाधाएकूण ५३ देशांत ३३३६ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी २५ जण मरण पावले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र कोणत्या देशात किती भारतीय रुग्ण आहेत, हे समजू शकले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टर