शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्य सचिवांना समन्स बजावू

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

हायकोर्टाची तंबी : मोटार अपघात लवादात न्यायाधीशांची कमतरता

हायकोर्टाची तंबी : मोटार अपघात लवादात न्यायाधीशांची कमतरता

नागपूर : मोटार अपघात दावा लवादातील न्यायाधीशांच्या कमतरतेविषयीच्या प्रकरणात ४ मार्चपर्यंत उत्तर सादर न केल्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना समन्स बजावू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे.
यासंदर्भात राजेश गजघाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूर येथे लवादाचे ८ अतिरिक्त न्यायपीठ स्थापन करण्यात यावे व दोन न्यायपीठांतील रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी त्यांची विनंती आहे. सध्या नागपुरात लवादाची ४ न्यायपीठे आहेत. न्यायालयाने याप्रकरणात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. तेव्हापासून प्रतिवादींनी अनेकदा वेळ घेऊनही उत्तर सादर केलेले नाही. यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. याचिकेत राज्य शासनाचे मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, गृह विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
अपघातात ठार झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना महाराष्ट्र मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार दावा दाखल केल्यानंतर ४५ दिवसांत तात्पुरती भरपाई, तर ६ महिन्यांत पूर्ण भरपाई मिळायला पाहिजे. परंतु, प्रलंबित दाव्यांची संख्या मोठी असल्यामुळे तात्पुरती भरपाई मिळायलाच २ ते ३ वर्षे लागतात. पूर्ण दावा ६ ते ७ वर्षांनंतर निकाली निघतो. परिणामी पीडितांना उपजीविका चालविणे कठीण जाते. पैसे नसल्याने बरेचदा जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो. लवादात सध्या सुमारे ८००० दावे प्रलंबित आहेत. दरवर्षी १५०० वर नवीन दावे दाखल होतात. त्यातुलनेत दरवर्षी फार कमी दाव्यांवर अंतिम निर्णय होतो. लवादातील न्यायाधीशांवर कामाचा प्रचंड ताण आहे. न्यायाधीशांची संख्या १२ केल्यास ६ न्यायाधीश जुने दावे तर, ६ न्यायाधीश नवीन दावे निकाली काढतील. अशाप्रकारे पीडितांना वेळेत न्याय देता येईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रिया गावंडे यांनी बाजू मांडली.