शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

... तर केजरीवालांना गोळी घालू - स्वामी ओम

By admin | Updated: February 9, 2015 16:18 IST

अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ९ - अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम यांनी केजरीवाल यांच्याविरुध्द दिल्लीत निवडणूक लढविली असून या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. स्वत:ला हिंदु महासभेचे नेते म्हणवून घेणा-या स्वामी ओम यांची मुलाखत असलेला एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या, हिंदू महासभा आमची पार्टी असून नथूराम गोडसे हे आमच्याच पार्टीतील होते. महात्मा गांधी यांनी देशाचे तुकडे पाडण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्यावर गोळया झाडल्या. आगामी काळात जो कोणी देशविरोधी कारवाया करेल त्यांना आधी प्रेमाने समजवण्यात येईल नंतर मात्र त्यांना गोळया घालू असे स्वामी म्हणाले. केजरीवाल यांना याआधी प्रेमाने समजावून सांगितले आहे आता जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना थेट गोळी घालू. विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहिलो याचे कारण सांगताना स्वामी म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या मतांची विभागणी होवून भाजपाची उमेदवार नूपुर शर्मा यांना त्याचा थेट फायदा व्हावा हा उद्देश होता. आपल्यासोबत आसाराम बापू आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते यांच्यासह १८ लाख लोकांचे समर्थन असल्याचा दावा करतानाच भाजपा ही आपलीच पार्टी असून २००४ ते २०१४ या काळात आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी काम केल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.