शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

...तर पाकिस्तानात जाऊन योगा शिकवेन- रामदेव बाबा

By admin | Updated: June 18, 2017 17:47 IST

21 जून रोजी येणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस पाकिस्तानात जाऊन साजरा करण्याची मनीषा योग गुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. 18 -  21 जून रोजी येणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस पाकिस्तानात जाऊन साजरा करण्याची मनीषा योग गुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे. रामदेव बाबा यांना पाकिस्तानातील योग कार्यक्रम राबवायचा आहे, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याची तयारीही दर्शवली आहे.पाकिस्तानकडून मला योगा शिकवण्यासाठी निमंत्रण आलं आहे. पाकिस्तानमधला प्रत्येक व्यक्ती हा दहशतवादी नाही. शेजारील देशांनाही योगा शिकवण्याची गरज आहे. मात्र मला पाकिस्तानातल्या राजकीय अस्थिरतेची चिंता आहे. तरीही मी पाकिस्तानात जाणार आहे, असंही रामदेव बाबांनी सांगितलं आहे. चार दिवसांच्या योग शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं ते गुजरातमध्ये बोलत होते. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी भारत सरकारनं जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफीद सईदला संपवण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य पावलं उचलली पाहिजेत. पाकिस्तानमधील सामान्य लोक हे वाईट नाहीत, फक्त त्यातील काही जण दहशतवाद पसरवतात. पाकिस्तानमधील लोक चांगले असल्यानेच तिथे जाऊन योगा शिकवायला आवडेल, असेही रामदेव बाबा म्हणाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचंही रामदेव बाबांनी पुन्हा समर्थन केलं आहे. नोटाबंदीचं फलित म्हणून स्विस बँक काळा पैसे धारकांची माहिती देण्यासाठी तयार झाली आहे. भारताच्या सीमाभागात अजूनही बनावट नोटा सापडत असल्यानं दहशतवादाचा धोका कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क असून, दहशतवादाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले आहेत.