शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

...तर मुस्लिमांसाठी नवा घटस्फोट कायदा करू

By admin | Updated: May 16, 2017 06:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने मौखिक तलाक (ट्रिपल तलाक) बेकायदा आणि घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केला, तर मुस्लीम समाजातील विवाह विच्छेदनासाठी केंद्र सरकार नवा कायदा करेल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मौखिक तलाक (ट्रिपल तलाक) बेकायदा आणि घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केला, तर मुस्लीम समाजातील विवाह विच्छेदनासाठी केंद्र सरकार नवा कायदा करेल, असे स्पष्टीकरण अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी सोनवारी दिले. ‘ट्रिपल तलाक’ रद्द झाला, तर मुस्लीम पुरुषाला विवाहसंबंधातून काडीमोड घेण्याचा पर्यायी मार्ग काय? या न्यायालयाच्या प्रश्नावर त्यांनी हा खुलासा केला. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी आग्रह धरल्यावर न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, तूर्तास वेळ कमी असल्याने फक्त ‘ट्रिपल तलाक’ची वैधता तपासून पाहणार आहोत. दोन सदस्यीय खंडपीठाने विचारार्थ ठरविलेले ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्व हे दोन विषय खुले ठेवून, त्यावर नंतर विचार केला जाईल. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीश जगदीश सिंह केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठासमोर सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक बेकायदा ठरवला, तर मुस्लीम समाजातील विवाह विच्छेदनासाठी सरकार नवा कायदा करेल. या पाच सदस्यीय पीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. यू.यू. ललित आणि न्या. अब्दुल नजीर यांचा सहभाग आहे. सुनावणीचा आजचा तिसरा दिवस होता. सुनावणीसाठी न्यायालयाने सहा दिवसांचा अवधी निश्चित केला आहे. ज्येष्ठ वकील सलमान खुर्शिद यांनी ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ची बाजू सांगत, ट्रिपल तलाक कसा मान्य आहे, हे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’चा हा प्रकार सर्वांत वाईट असल्याचे मत व्यक्त केले होते. रामजेठमलानी यांनी स्पष्ट केले होते की, ट्रिपल तलाकचा अधिकार फक्त पतीलाच आहे. पत्नीला नाही. कलम १४ नुसार समानतेच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे. ही घटनाबाह्य वर्तवणूक आहे. अन्य काही देशांत ट्रिपल तलाक रद्द होण्याचे काय कारण असू शकते? असा सवालही न्यायालयाने खुर्शिद यांना केला होता. हा प्रकार तर मृत्युदंडासारखा असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते. --------------------पुरुषांसाठी हवा कायदाब्रिटिशांच्या राजवटीत सन १९३९ मध्ये केलेला ‘डिझोल्युश्न आॅफ मुस्लिम मॅरेज अ‍ॅक्ट’ हा कायदा भारतात अस्तित्वात आहे. मात्र तो फक्त मुस्लिम धर्मशास्त्रानुसार विवाह झालेल्या स्त्रियांना लागू होतो व १० ठराविक कारणांवरून पतीपासून घटस्फोट मागण्याचा त्यांना हक्क देतो. मौखिक तलाक देणाऱ्या पुरुषांना कोणत्या कारणाने काडीमोड घ्यावा याचे कोणतेही बंधन नाही. काही मुस्लिम धर्मशास्त्रींनुसार ‘ट्रिपल तलाक’ला धर्मशास्त्रांची मान्यता नाही व हे एक घृणास्पद कृत्य मानले गेलेले आहे. म्हणूनच ‘ट्रिपल तलाक’ रद्द केला गेला तर मुस्लिम पुरुषांना वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी कायदेशीर मार्ग काय, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता.