शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कुरुक्षेत्रात स्थापित होणार जगातील सर्वांत मोठी गीता, वजन १००० किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 08:01 IST

मिलानमध्ये तयार होत आहे पवित्र ग्रंथ; ७०० पाने यंत्राद्वारे उलटावी लागणार

चंडीगड - हरयाणातील कुरुक्षेत्र या ऐतिहासिक शहराच्या ज्योतीसरमध्ये जगातील सर्वांत मोठी गीता स्थापन करण्यात येणार असून, या ग्रंथाचे वजन १००० किलो असेल. इटलीच्या मिलानमध्ये हा ग्रंथ यूपो सिंथेटिक पेपरपासून तयार करण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जगातील पहिल्या रथासारख्या मंदिरात हा ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. या ग्रंथाची सुमारे ७०० पाने यंत्राद्वारेच उलटावी लागणार आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन यांची एकाचवेळी पूजा होणारे हे पहिलेच मंदिर असेल. 

या मंदिराचे बांधकाम इस्कॉनकडून केले जात आहे. भगवान श्रीकृष्णांनी ५,१६० वर्षांपूर्वी ज्याठिकाणी कर्मयोगाचा अमर संदेश दिला होता, त्याठिकाणी होत असलेल्या श्रीकृष्ण-अर्जुन मंदिरात गीता ठेवली जाईल. या मंदिरात अत्याधुनिक गीता संग्रहालयही उभारले जात आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा संदेश कसा दिला, हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथे दाखवण्यात येणार आहे. मंदिरात एकाच वेळी ६०० भाविकांना कीर्तन करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

रथासारख्या मंदिरासाठी मुंबईत तयार केले घोडेमंदिराचे व्यवस्थापक साक्षी गोपाल दास यांनी सांगितले की, या रथासारख्या मंदिरासाठी ४० फूट लांब आणि ३० फूट उंचीचे घोडे मुंबईत तयार करण्यात आले आहेत. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण रथारूढ होऊन अर्जुनाला गीतेचा संदेश देत होते, त्याच दृश्यांचे मंदिरात चित्रण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पवित्र गीता आणि या मंदिराचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.