शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!
2
रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
3
Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम
4
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
5
तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...
6
प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...
8
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
9
एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू
10
आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
11
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
12
Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!
13
UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले
14
अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
15
विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा
16
नागपूरच्या एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट; ५ ठार, ६ जखमी
17
वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार
18
Mumbai Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या... आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक
19
‘अजंठा कॅटमरॉन’चा परवाना निलंबित; सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
20
'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले

जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 06:23 IST

Burundi largest bank note news: नाणी व चलनातील नोटांचा संचय करणारे राजस्थानच्या बिकानेर शहरातील सुधीर लुणावत यांच्यासाठी बुरुंडी बँकने ही नोट पाठवली आहे.

नवी दिल्ली : पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी देशाने गत फेब्रुवारी महिन्यात जारी केलेली १० हजार फ्रँकची जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल झाली आहे. नाणी व चलनातील नोटांचा संचय करणारे राजस्थानच्या बिकानेर शहरातील सुधीर लुणावत यांच्यासाठी बुरुंडी बँकने ही नोट पाठवली आहे. यापूर्वी २०१७ साली मलेशियाने छापलेली ६०० रिंगिटची नोट जगातील सर्वांत मोठी बँकनोट ठरली होती.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! वन्यजीव आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पतीच्या संबंधित आंतरराष्ट्रीय व्यापार संमेलनाच्या ५० व्या वर्धापनादिनानिमित्त ही नोट छापल्याचा दावा सुधीर यांनी केला आहे. 

या नोटेवर सिंह, जिराफ, म्हैस, बिबट्या, आफ्रिकन हत्ती व गेंड्यावर बसलेला एक दुर्मीळ आफ्रिकन पक्षी दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला फ्रेंच भाषेत नोटचे वर्णन केले असून त्या भागाच्या डिझाइनमध्ये बुरुंडीचे राष्ट्रीय चिन्ह, पारंपरिक नृत्य, ढोलकी वाजणाऱ्यांचे चित्र, राष्ट्रपतींचे निवासस्थान, राष्ट्रीय ध्वज आणि सेंट्रल बँकेचा लोगो व नकाशा समाविष्ट केलेला आहे.

दोन सुरक्षा धागे 

सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये दोन सुरक्षा धागे, ग्लोबचा वॉटरमार्क तसेच नोटेवर दोन सोनेरी तारे असून वेगवेगळ्या कोणातून त्याकडे पाहिल्यास रंग बदलतात. 

बुरुंडी सरकारने या प्रकारच्या केवळ एक हजार नोटा छापल्या आहेत. त्यामुळे ही नोट संग्रहात ठेवण्यासाठी जगभरातून मागणी होत आहे.

टॅग्स :MONEYपैसाInternationalआंतरराष्ट्रीय