शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?; डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीपर्यंत चालण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:04 IST

संसदेच्या नव्या इमारतीत संपूर्ण हिवाळी अधिवेशन घेणे शक्य दिसत नाही.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता नसून, लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अधिवेशन डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसद अधिवेशन लांबणीवर पडण्यामागे दोन कारणे दिसतात. पहिले म्हणजे गुजरातमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणूक आणि दुसरे म्हणजे नव्यानेच उभारण्यात आलेल्या इमारतीत लोकसभा-राज्यसभेच्या सदस्यांचे संयुक्त संबोधन घेण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आग्रहामुळे.

संसदेच्या नव्या इमारतीत संपूर्ण हिवाळी अधिवेशन घेणे शक्य दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त नव्या इमारतीत हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. यावर व्यवहार्य तोडगा म्हणून संयुक्त बैठक नव्या इमारतीत घ्यायची व नियमित सत्र जुन्या इमारतीच्या दोन्ही सभागृहांत घ्यायचे, असे ठरविण्यात आले आहे. अधिवेशन नोव्हेंबरनंतर घेण्यात येत असल्याबद्दल काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवला असला तरी यापूर्वीही असे झालेले आहे, असा दाखला देण्यात येत आहे.

सरकार काय घेतेय काळजी? 

संसदीय व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, २०१७ मध्येही हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर रोजी सुरू झाले होते व ५ जानेवारीपर्यंत चालले होते. विधानसभा निवडणुका आणि संसद अधिवेशनाच्या तारखा एकाचवेळी येऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारकडून महत्त्वाचे धोरणात्मक विषय हाताळले जात असल्यामुळे ही काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभा