शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"तामिळनाडू सरकारला वाटलं असेल की…",  ₹ चिन्ह हटवण्याचा निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते उदय कुमार यांचं विधान     

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:01 IST

D. Uday Kumar News: तामिळनाडू सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते आणि आयआयटी गुवाहाटीचे प्राध्यापक डी. उदय कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

तामिळनाडू सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना रुपयासाठी नवं चिन्ह प्रसिद्ध केलं. तामिळनाडू सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशभरात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, तामिळनाडू सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते आणि आयआयटी गुवाहाटीचे प्राध्यापक डी. उदय कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उदय उदय कुमार यांनी या संपूर्ण वादात पडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

प्राध्यापक उदय कुमार म्हणाले की, ते म्हणाले की, या निर्णयाबाबत माझ्याजवळ कुठलीही प्रतिक्रिया नाही आहे. सरकारला अचानक वाटलं असेल की, बदलाची आवश्यकता आहे, तसेच त्यांना आपला धोरण राबवायचं असेल, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे माझ्याकडे याबाबत सांगण्यासारखं काहीही नाही आहे. हा निर्णय संपूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे.

उदय कुमार यांनी डीएमकेशी असलेला संबंध आणि वडिलांबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझे वडील माझ्या जन्मापूर्वीच आमदार होते. आता ते वृद्ध झाले असून, आमच्या गावात शांतपणे आपलं जीवन जगत आहेत. हा केवळ योगायोग आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,  तामिळनाडूत पेटलेल्या हिंदी भाषेविरोधातील   वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.  तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली आहे.   देशामध्ये  देशभरात '₹' चिन्ह अर्थसंकल्पाचं अधिकृत प्रतिक आहे. मात्र तामिळनाडू सरकारने तेही बदलून टाकलं आहे. ₹ या चिन्हाच्या जागी ज्या  ரூ चिन्हाची जागा घेण्यात आली आहे, ते तामीळ लिपीमधील रु अक्षर आहे. तसेच कुठल्याही राज्याने '₹' चिन्ह बदलून त्याजागी आपलं चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम