शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 08:14 IST

बनली पहिली आदिवासी दिवाणी न्यायाधीश

चेन्नई : तामिळनाडूच्या आदिवासी समुदायातील महिला व्ही. श्रीपथी या महिलेची दिवाणी न्यायाधीशपदासाठी निवड झाली आहे. ती राज्यातील पहिली महिला आदिवासी आहे, जिची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराजवळील पुलियूर गावातील रहिवासी असलेल्या श्रीपथीने नोव्हेंबर २०२३ मध्ये परीक्षेला बसण्यासाठी २५० किमीचा प्रवास करून चेन्नई गाठली होती. यामुळे तिची ही कहानी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. श्रीपथीच्या परीक्षेच्या दिवशीच तिची प्रसूतीची तारीखही होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधी तिने मुलाला जन्म दिला. 

nतिने प्रसूतीनंतर आपला जीव धोक्यात घालून परीक्षेला बसण्यासाठी चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला. ती परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाली आणि तिच्या समाजातील पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश बनली.

nतिच्या या यशाबद्दल तिच्या गावानेही स्वागत समारंभ आयोजित केला होता. या यशानंतर श्रीपथी यांचे त्यांच्या गावात ढोल-ताशे, हार आणि भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. तिच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

गावकऱ्यांनी केले जंगी स्वागतnव्ही. श्रीपथी कलिअप्पन आणि मल्लिगा यांची मोठी मुलगी आहे. बी.ए. आणि कायद्याची पदवी घेण्यापूर्वी श्रीपथीने येलागिरी हिल्समध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिचे लहान वयातच लग्न झाले. तिने पती आणि आईच्या पाठिंब्याने एलएल.बी. पूर्ण केले आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज केला. 

मुख्यमंत्री म्हणतात...तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराच्या शेजारी असलेल्या पुलियूर गावातील श्रीपथीने वयाच्या २३ व्या वर्षी दिवाणी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एका वंचित डोंगरी आदिवासी मुलीने इतक्या कमी वयात हे यश मिळविले, हे पाहून मला आनंद झाला.एम.के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूexamपरीक्षाPregnancyप्रेग्नंसी