शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील, लष्करप्रमुखांच्या विधानानं चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 17:44 IST

India-China LAC: भारताचे लष्करप्रमख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील असल्याची माहिती दिली आहे.

भारताचे लष्करप्रमख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील असल्याची माहिती दिली आहे.  जनरल मनोज पांडे यांनी पूर्व लडाखमधील वादावर चीनचं नाव न घेता सांगितलं की, उत्तर सीमेवरील परिस्थिती सामान्य होण्याबरोबरच संवेदनशीलसुद्धा आहे. लष्कर प्रमुखांनी सांगितले की, येथील परिस्थितीचा  सामना करण्यासाठी पुरेसे लष्करी सैन्य तैनात आहे. तसेच सैन्याची  संख्या ही कायम राखली जाईल.

पूर्व लडाखमधील परिस्थितीबाबत जनरल पांडे यांनी सांगितले की, आमची हालचालींची तयाकरी उच्च स्तरावर आहे. पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. माध्यमांशी  बोतलाना त्यांनी पुढे सांगितले की, २०२३ मध्ये देशाच्या सीमेवरील हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. तसेच जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्येही घट नोंदवली गेली आहे. 

लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले की, भारतीय लष्कराने राष्ट्रहितासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लष्करामध्ये वेळेच्या मागणी अनुरूप आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अधिक सामंजस्यपूर्ण आणि भक्कम बनवण्यात आलं आहे. यावेळी मणिपूरमधील स्थितीबाबत लष्करप्रमुखांनी सांगितले की, संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर शांतता प्रस्थापित झाली आहे.

लष्करामध्ये नवं तंत्रज्ञान आणलं जात आहे.  उत्तम दळणवळण आणि संचार व्यवस्था, ड्रोन आणि सर्विलेंस सर्वांना समाविष्ट केले जात आहे. भारत अर्थव्यवस्थेच्या  बाबतीत भक्कमपणे पुढे जात आहे. भारतीय लष्कर देशातील विविध एजन्सी आणि राज्याच्या सरकारांसोबत मिळून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख