शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधी पुन्हा 'भारत जोडो यात्रा' काढणार, दुसरा टप्पा सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:34 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं.

नवी दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं. सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासांतर्गत राहुल गांधींनी सुमारे ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी आता यात्रेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा यावर्षी आयोजित करणार आहे.

काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास संपूर्ण प्रवासात ते राहुल गांधींसोबत होते. "पक्षाचे आता 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू झाले आहे. ही मोहीम तीन महिने चालणार आहे. या मोहिमेत पक्षाचे नेते व कार्यकर्ते यात्रेच्या यशाचा संदेश आणि देशातील राजकीय परिस्थिती घरोघरी पोहोचवणार आहेत. या मोहिमेनंतर भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा नक्कीच असेल", असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ते 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

प्रवासाचा दुसरा टप्पा नक्कीच असेल - वेणुगोपालवेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा कसा आयोजित करायचा हे आता आम्ही ठरवू. पक्षाकडून अद्याप अंतिम आराखडा आलेला नाही, मात्र दुसरा टप्पा नक्कीच असेल, ज्यामध्ये राहुल गांधी यांचा सहभाग असेल. पक्षात अनेकांचं मत जाणून घेतलं जात आहे आणि काँग्रेस वर्षभर मैदानात राहणार आहे.

भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काँग्रेसने आज जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीदरम्यान रॅली काढली. शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमपासून निघालेल्या रॅलीचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. यात द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड), नॅशनल कॉन्फरन्स (NC), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा