शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’चा ‘रिमोट’ भारतीयांच्या हाती ! भारतीय डेव्हलपर्स हे जगाचे ‘अदृश्य शिल्पकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 06:30 IST

अमांडा ब्रॉक यांनी एका मुलाखतीत तंत्रज्ञानाची तुलना पिझ्झासोबत केली. त्या म्हणाल्या, जेव्हा पिझ्झा खातो, तेव्हा त्यावरील टॉपिंग्सबद्दल बोलतो; पण खरी चव आणि आधार हा ‘बेस’ असतो.

नवी दिल्ली :आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या (एआय) या युगात भारतीय डेव्हलपर्स हे जगाचे ‘अदृश्य शिल्पकार’ असून, भारत या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा देश बनला आहे, असे गौरवौद्गार ‘ओपन यूके’च्या मुख्य सीईओ अमांडा ब्रॉक यांनी काढले.

अमांडा ब्रॉक यांनी एका मुलाखतीत तंत्रज्ञानाची तुलना पिझ्झासोबत केली. त्या म्हणाल्या, जेव्हा पिझ्झा खातो, तेव्हा त्यावरील टॉपिंग्सबद्दल बोलतो; पण खरी चव आणि आधार हा ‘बेस’ असतो. तो बेसच नसेल, तर पिझ्झाला अर्थ नाही. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे तंत्रज्ञानाचा असाच ‘बेस’ तयार करतात. जगभरातील क्लाउड सेवा, मोबाइल ॲप्स व इंटरनेट सुरक्षा आज ज्या पायावर उभी आहे, तो पाया भारतीय तरुण बुद्धिमत्तेने मजबूत करत आहेत. पूर्वी आपण परदेशी सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरायचो; पण ब्रॉक यांच्या मते, आता चित्र बदलले आहे.

शेतकऱ्यांना ‘रिअल टाइम’ सल्ला हवा

शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे. संशोधक आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा दुवा सध्या तुटलेला असून, सरकारी यंत्रणांचे लक्ष केवळ बियाणे-खते वाटपावर आहे. शेतकऱ्यांना नेमक्या सल्ल्याची गरज असते. ही माहितीची दरी भरून काढण्यासाठी ‘एआय’  क्रांती करू शकते, असे ठाम मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केले.

एआय परिषदेत जगातील दिग्गज उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सहभागी होणार की नाही, याबाबत माेठा संभ्रम निर्माण झाला आहे.

‘डीपफेक’चा विळखा रोखण्यास येणार अधिक कडक कायदे

‘डीपफेक’ व्हिडीओ आणि फोटोची समस्या गंभीर होत असून, मुले आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी सध्याच्या नियमांपेक्षा अधिक कडक कायदे आणण्याची गरज आहे, असे स्पष्ट संकेत केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिले.

डीपफेकमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. संसदेतही या विषयावर सर्वांचे एकमत घडवून आणले जाईल, असे ते म्हणाले.

वैष्णव यांनी मागितली माफी

देशाची राजधानी दिल्लीत सध्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समीट’ या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान परिषदेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी झालेल्या अलोट गर्दीमुळे आणि नियोजनातील त्रुटींमुळे उपस्थितांना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळाची दखल घेत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी जाहीर माफी मागितली.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian developers shaping global AI; laws to tackle deepfakes strengthened.

Web Summary : Indian developers are vital to global AI, says Open UK's CEO. Government focuses on AI in agriculture and stricter laws against deepfakes. Minister Vaishnav apologized for summit disorganization.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स