शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराचा फोन पोलिस जप्त करू शकत नाहीत; केरळ हायकोर्टाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 05:51 IST

सीआरपीसी आवश्यक, सीआरपीसीचे उल्लंघन करून पत्रकाराचा मोबाइल फोन पोलिसांना जप्त करता येत नाही

डॉ. खुशालचंद बाहेतीतिरुवनंतपुरम - पत्रकाराच्या फोनमध्ये एखाद्या गुन्ह्याची माहिती असू शकते म्हणून काही पोलिस त्याचा मोबाइल जप्त करू शकत नाहीत. यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे, असे केरळ हायकोर्टाने म्हटले. 

जी. विशाकन हे मल्याळम दैनिकात पत्रकार आहेत. ते राजकीय आणि चालू घडामोडी कव्हर करतात. ७ जुलै रोजी तीन पोलिस अधिकाऱ्यांनी  त्यांच्या घराची तासभर झडती घेतली. नंतर त्यांना कार्यालयात बोलावून त्यांचा मोबाइल जप्त केला. जी. विशाकन यांनी त्यांना त्रास दिला जाऊ नये आणि मोबाइल फोन आणि सीमकार्ड परत करावे यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांचा  युक्तिवाद असा की, कोणत्याही न्यायालयाने घरझडतीचे  वॉरंट जारी केले नव्हते. त्यांना कलम ४१ (अ) सीआरपीसी नोटीसदेखील दिली नाही. ज्या गुन्ह्यात झडती आणि जप्ती केली, त्यात त्यांना आरोपी केलेले नाही. एका आरोपीशी त्यांचे चांगले संबंध आहेत, परंतु हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे आणि त्यामुळे त्यांनी गुन्हा केल्याचा संशय घेण्याचे कारण नाही. पोलिस आमदारांच्या प्रभावाखाली वागत असल्याचा त्यांनी आरोप केला. 

सीआरपीसीचे उल्लंघन करून पत्रकाराचा मोबाइल फोन पोलिसांना जप्त करता येत नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. पत्रकारांना सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मिळू शकते, परंतु हे त्यांचे फोन जप्त करण्याचे कारण असू शकत नाही, असेही  उच्च न्यायालयाने नमूद केले.

पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांच्या मोबाइलमध्ये अनेक प्रकारची  माहिती असू शकते. सीआरपीसीचा अवलंब केल्याशिवाय त्यांचा मोबाइल जप्त करता येत  नाही. - न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन

टॅग्स :Courtन्यायालय