शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:55 IST

West Bengal Government: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामधून शेकडो घुसखोरांची पडताळणी करून त्यांना बांगलादेशात माघारी धाडण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे. हे सर्व जण पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापैकी ४ जण हे मुर्शिदाबाद येथील तर एक जण पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर होत असलेल्या कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे.

पश्चिम बंगाल मायग्रेट वेल्फेयर बोर्डाचे प्रमुख समीरुल इस्लाम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशान्वये राज्य सरकार आणि पोलिसांनी केंद्र सरकार आणि बीएसएफला या संदर्भातील माहिती दिली. त्यानंतर मेहबूब शेख आणि शमीम खान यांना सोमवारी भारतात आणण्यात आले. तर इतरांना रविवारी भारतात आणण्यात आले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील आणखीही काही नागरिकांना बांगलादेशी समजून बांगलादेशमध्ये पाठवण्यात आले का, याचा शोध आम्ही घेत आहोत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. तसेच भाजपा बंगाली भाषक नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशwest bengalपश्चिम बंगाल