शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 06:02 IST

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत. 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे केंद्रातील सरकार सत्तेवरून घालविणे इतकेच विरोधी पक्षांचे उद्दिष्ट आहे. मात्र, देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची संख्या आणखी कमी होणार असून, भाजपचे संख्याबळ वाढणार आहे. पुन्हा विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केले असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत. १३ डिसेंबरला दोन जणांनी संसदेत घुसखोरी केली होती. देशातील बेकारी, महागाईमुळे संसदेत घुसखोरी करण्याचा प्रकार घडला, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. मोदी यांनी सांगितले की, लोकशाही आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने संसदेतील घुसखोरीचा निषेध करायला हवा. निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष निराश झाले आहेत. त्यामुळे ते आता संसदेच्या कामात व्यत्यय आणत आहेत, असे मोदी म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रेतून खूप शिकता आलेnपंतप्रधान म्हणाले की, भाजपच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. n२६ जानेवारीपर्यंत सुरू राहाणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये अनेक चांगले अनुभव येत असून, त्यातून खूप काही शिकता येण्यासारखे आहे.

‘त्या’ खासदारांचे २७ प्रश्न यादीतून हटविलेलोकसभेतील निलंबित विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विचारलेले २७ प्रश्न मंगळवारी प्रश्नांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मंत्र्यांना समान प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांच्या गटातून अनेक निलंबित खासदारांची नावे काढून टाकण्यात आली असल्यााचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदlok sabhaलोकसभा