शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नोकरीच्या शोधात JOB सोडणाऱ्यांची संख्या वाढली; रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 20:36 IST

गेल्या काही वर्षांत भारतात कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे

 नवी दिल्ली - एकीकडे देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, तर दुसरीकडे देशात काम करणारे लोक नोकरी सोडून जाण्याचा विचार करत आहेत. देशातील ३० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची आहे. तर ७१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, कामाकडे कंपनीचं दुर्लक्ष होत असल्यानं करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी पुढे जायला हवं असा खुलासा रिपोर्टमधून झाला आहे.  

PWC इंडियाच्या एका अहवालात असं म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत भारतात कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. मालक आणि कर्मचारी या दोघांच्याही मानसिकतेत बदल झाला आहे. हा अहवाल PWC च्या 'ग्लोबल वर्कफोर्स होप्स अँड फियर्स सर्व्हे २०२२' च्या निष्कर्षांवर आधारित आहे. भारतातील २६०८ कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले होते आणि त्यापैकी ९३ टक्के पर्मनंट कर्मचारी आहेत.

नोकरी बदलण्याची शक्यता जास्तसर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते नोकरी बदलण्याची शक्यता जास्त आहे. तर जागतिक स्तरावर १९ टक्के कर्मचाऱ्यांनी हे मत व्यक्त केले. याशिवाय ३२ टक्के कर्मचारीही नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. तर १९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले कर्मचारी नवीन नोकरी शोधण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा ३७ टक्के लोकांनी पुढील एका वर्षात नोकऱ्या बदलण्याचे संकेत दिले आहेत. सर्वेक्षणानुसार, १९९० च्या दशकाच्या अखेरीस आणि २०१० च्या दशकाच्या सुरुवातीस जन्मलेल्या कर्मचार्‍यांची नोकरी सोडण्याची शक्यता कमी आहे.

जूनमध्ये बेरोजगारीचा दर ७.८० टक्के जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर ७.८० टक्क्यांवर पोहोचला होता. त्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात ७.३० टक्क्यांवरून जूनमध्ये ८.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात, परिस्थिती थोडी बरी होती आणि बेरोजगारीचा दर ७.३ टक्के नोंदवला गेला, जो मे मध्ये ७.१२ टक्के होता. आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा सर्वाधिक दर हरियाणात ३०.६ टक्के होता. त्यापाठोपाठ राजस्थान २९.८ टक्के, आसाम १७.२ टक्के, जम्मू आणि काश्मीर १७.२ टक्के आणि बिहार १४ टक्के आहे. 

टॅग्स :jobनोकरी