शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 06:55 IST

७० टक्के बांधकाम पूर्ण

लखनौ : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्वीट करून दिली. राम मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, गर्भगृहाचे खांब १४ फुटापर्यंत तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याच दिवसापासून भक्तांना मंदिरात पूजा-अर्चाही सुरु करता येणार आहे. 

मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये तर २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे आकाराला येईल. 

जानेवारी २०२४ मध्ये मंदिरात पूजाअर्चा सुरू होऊ शकेल. मंदिराच्या उभारणीवर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकूण खर्च १८०० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.  

दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापनामाध्यमातील वृत्तानुसार, राम मंदिरात नवीन आणि जुन्या अशा दोन्ही राम मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची योजना आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करतील. त्या दिवशी मूर्तीच्या ललाटावर ५ मिनिटे किरणे राहतील. त्याला ‘सूर्य तिलक’ असे म्हटले आहे. 

अनेक ठिकाणांहून आणल्या शिळारामलल्लाच्या मूर्तीसाठी अनेक ठिकाणांहून शिळा आणण्यात आल्या आहेत. यात नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या शालिग्राम शिळांचा समावेश आहे. मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणारी मूर्ती ही भगवान श्रीरामाच्या बालपणीची असेल. ही मूर्ती प्राचीन ग्रंथात नमूद शास्त्रीय पद्धतीनुसार साकारली जाणार आहे.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या