शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:26 IST

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे इंटरनेट डाटाच्या किमतीत घट झाली आहे. आज इतर देशांतील डाटाची किंमत भारताच्या तुलनेत दहापट जास्त आहे. जगाला जोडणे हेच भारताचे मिशन आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे भरलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसच्या उद्घाटनावेळी केले. यावेळी केंद्रीय दळवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील उपस्थित होते. या परिषदेला जगभरातील १२० देशांमधून अधिक प्रतिनिधी आणि सुमारे ९०० स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. 

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

२०० पेक्षा अधिक मोबाइल निर्मिती युनिट - यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने बसविलेल्या ऑप्टिकल फायबरची लांबी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतराच्या आठपट आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही ५जी लाँच केले. आज देशातील प्रत्येक जिल्हा ५जीने जोडला गेला आहे. आता आम्ही ६जीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. - मोबाइल भारतात तयार केल्याशिवाय स्वस्त होऊ शकत नाहीत. २०१४ मध्ये देशात फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट होते. आज भारतात २०० पेक्षा अधिक  निर्मिती युनिट आहेत. पूर्वी परदेशातून फोन आयात करीत होतो. आता देशात सहा पट अधिक फोन बनविले जात आहेत, असे ते म्हणाले. प्र- प्राचीन सिल्क रुटपासून आजच्या काळाताील तंत्रज्ञानाच्या मार्गापर्यंत भारत केवळ जोडण्याचे काम करीत आला आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

११६ कोटी मोबाइल कनेक्शन्स : सिंधिया ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, भारतातील मोबाइल कनेक्शन ९०.४ कोटींवरून वाढून ११६ कोटींच्या घरात पोहोचली आहेत. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचे ९२.४ कोटी यूजर्स आहेत. भारतातील ऑप्टिकल फायबल केबल १.१० कोटी किलोमीटरची होती, तीच आज ४.१० कोटी किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. 

भारतीय डाटा देशातच राहावा : आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेयरमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी म्हणाले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एआयचे योगदान मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे भारताने तातडीने एआयचा अवलंब करावा. डेटा सेंटर धोरणाचा २०२० मसुदा अद्ययावत करण्याची आम्ही सरकारला विनंती करतो. भारतीय डाटा देशातील डाटा सेंटरमध्येच राहिला पाहिजे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय