शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वाद्यांची जगावर जादू! विदेशात मागणी वाढली; हार्मोनियम, तबल्याची सर्वाधिक निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 08:13 IST

गेली दोन वर्षे कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन, तसेच प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे कंटाळलेल्या लोकांचा संगीत शिकण्याकडे व इतर छंद जोपासण्याकडे कल वाढला.

नवी दिल्ली :

गेली दोन वर्षे कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन, तसेच प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे कंटाळलेल्या लोकांचा संगीत शिकण्याकडे व इतर छंद जोपासण्याकडे कल वाढला. त्याच्या परिणामी कोरोनाच्या काळात सतार, तानपुरा, हार्मोनियम, तबला आदी वाद्यांची भारतातून होणारी निर्यातही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विदेशामध्ये लॉकडाऊनमध्ये घरातून काम करणाऱ्या लोकांनी आपल्या छंदांकडेही लक्ष दिले. त्यांनी भारतीय वाद्यांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी केली. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी २६ ऑक्टोबरला केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत भारतातील निर्यातीचे प्रमाण २०१३ मध्ये याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत ३.५ पट अधिक आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करत म्हटले होते की, भारतीय वाद्यांना जगभरात मोठी मागणी आहे. भारतीय संगीताची लोकप्रियता जगभरात वाढत असून, या क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध आहेत.

२०२०-२१मध्ये २८७ कोटींची उलाढाल वाद्यांच्या निर्यातीतून२०१९-२० या वर्षी भारताने १९५.५२ कोटी रुपयांच्या संगीत वाद्यांची निर्यात केली होती. २०२०-२१ साली हा आकडा घसरून १८७.१४ कोटींवर आला. मात्र, २०२१-२२ या वर्षी कोरोनाच्या काळात भारतातून २८७.४५ कोटी रुपयांच्या भारतीय वाद्यांची निर्यात झाली. दिल्लीतील रिखी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे मालक अजय रिखीराम म्हणाले की, भारतीय वाद्यांच्या निर्यातीत झालेली वाढ उत्साहवर्धक आहे.

गिटारची भारतात लक्षणीय आयात     अजय रिखीराम म्हणाले की, पाश्चिमात्य वाद्यांतील गिटार या वाद्याची भारतातील आयात कोरोना साथीच्या काळात वाढली.    भारतातून निर्यात केलेल्या सतारची किंमत ७५ हजार ते ३.५ लाख रुपयांच्या, तर तानपुऱ्याची किंमत २५ हजार ते १.२५ लाख रुपयांच्या दरम्यान होती. भारतीय वाद्यांना अमेरिका व युरोपमधून सर्वाधिक मागणी होती.

टॅग्स :musicसंगीत