शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुरक्षा दलांचे स्थान मंदिरच; पंतप्रधान माेदींची भावना, लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दहावी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 11:05 IST

रविवारी मोदी लेपचा येथे पोहोचले. सैनिकांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

लेपचा (हिमाचल प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांच्या अतूट धैर्याचे कौतुक केले. ‘माझ्यासाठी भारतीय लष्कर जिथे आहे, जिथे सुरक्षा दल तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही,’ असे ते म्हणाले.

रविवारी मोदी लेपचा येथे पोहोचले. सैनिकांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये ते त्यांना मिठाई खाऊ घालताना दिसतात. ‘हिमाचल प्रदेशातील लेपचामध्ये आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा भावनिक आणि अभिमानाने भरलेला अनुभव होता,’ असे पंतप्रधानांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘आपल्या राष्ट्राचे रक्षक, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळ करतात. त्यांच्या प्रियजनांपासून दूर, अतिदुर्गम भागात तैनात असताना त्यांचा त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवते. या वीरांचा भारत सदैव ऋणी राहील.’ तत्पूर्वी मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पुन्हा सत्ते आल्यानंतरही खंड नाही२०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दिवाळी साजरी केली. २०२० मध्ये दिवाळीच्या दिवशी ते लोंगेवाला सीमा चौकीवर होते आणि २०२१ मध्ये त्यांनी नौशेरा येथे सैनिकांसोबत सण साजरा केला. 

२०१४ पासून जवानांसोबत प्रत्येक दिवाळी  साजरी२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी लष्करी जवानांना भेट देत आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी सियाचीन हिमनदी येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१५ मध्ये, १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, त्यांनी पंजाबमधील तीन स्मारकांना भेट दिली जिथे भारतीय सशस्त्र दलांनी भयंकर लढाया लढल्या आणि ज्या देशाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. मोदी २०१७ मध्ये उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये होते, तर २०१८ मध्ये त्यांनी हरसिलमध्ये दिवाळी साजरी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश