शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला"; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:39 IST

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सडकून टीका केली आहे. 

Ashwini Vaishnaw Mark Zuckerberg News: २०२४ मध्ये भारतासह अनेक देशात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला हा मार्क झुकरबर्ग यांनी केलेला दावा चुकीचा आहे, असे म्हणत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांना सुनावले. झुकरबर्ग यांनी सत्यता आणि विश्वसनीयता कायम ठेवली पाहिजे, असे वैष्णव म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क झुकरबर्गच्या विधानावर आक्षेप घेत एक पोस्ट लिहिली आहे. 

तथ्यांनुसार हे चुकीचे आहे -वैष्णव

अश्विनी वैष्णव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जगातील सर्वात मोठी लोकशाही असेलल्या भारतात निवडणूक पार पडली आणि ६४० मिलियनपेक्षा अधिक मतदारांनी यात सहभाग घेतला. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दर्शवला. झुकरबर्ग यांचा हा दावा चुकीचा आहे की, कोविडनंतर भारतासह २०२४ मध्ये जगात झालेल्या निवडणुकांत सत्ताधारी सरकार पराभूत झाली, हा दावा तथ्यांनुसार चुकीचा आहे."

"800 मिलियन लोकांना मोफत धान्य, २.२ लोकांना मोफत लसीकरण आणि कोविड काळात जगातील इतर देशांना मदत करण्यापासून ते सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यापर्यंत... पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा निर्णायक विजय प्रशासन आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे", असेही वैष्णव यांनी म्हटले आहे. 

"मार्क झुकरबर्ग यांच्याकडून चुकीची माहिती दिली जाणे, हे निराशाजनक आहे. सत्य आणि विश्वसनीयता कायम ठेवा", असा टोला वैष्णव यांनी मार्क झुकरबर्ग यांना लगावला. 

मार्क झुकरबर्ग काय म्हणाले?

जो रोगन यांच्यासोबत झालेल्या पॉडकास्टमध्ये बोलताना मार्क झुकरबर्ग यांनी २०२४ च्या निवडणुकीबद्दल एक विधान केलं होतं. 

2024 मध्ये जगभरात झालेल्या निवडणुकांचा उल्लेख करत मार्क झुकरबर्ग म्हणालेले की, "२०२४ हे वर्ष जगभरात निवडणुकांचं वर्ष राहिले आणि भारतासह अनेक देशात निवडणुका झाल्या. जवळपास सर्वच सत्ताधारी निवडणुकीत पराभूत झाले.  पूर्ण वर्षात कुठल्या ना कुठल्या स्वरुपाची जागतिक पटलावर परिणाम करणारी घटना घडल्या. मग ते मुद्रा धोरण असो की, कोविडचा सामना करण्यासाठीची आर्थिक धोरणे किंवा सरकारच्या कोविडचा सामना करण्याच्या कार्यपद्धती, असे वाटते की याचा परिणाम जागतिक स्वरुपावर झाला होता."

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गMetaमेटाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी