नवी दिल्ली : अर्थसंकल्प २०२६-२७ व सलग झालेल्या जागतिक मुक्त व्यापार करारांच्या बळावर ‘विकसित भारत’चे ध्येय आता दृष्टीपथात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. या प्रवासात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असे स्पष्ट करत त्यांनी खासगी उद्योग क्षेत्राला अधिक आक्रमक व धाडसी गुंतवणुकीचे आवाहन केले.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी उत्पादन, सेवा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र बळकट झाल्यामुळे भारताने ३८ देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले, असे म्हटले.
IND vs PAK : टीम इंडियाचा 'ई'शानदार विजय! पाकिस्तानचा धुव्वा उडवत दाबात मारली सुपर ८ मध्ये एन्ट्री
तीन दशकांसाठी तीन गाेष्टींवर भर
संरचनात्मक सुधारणांचा वेग कायम ठेवणे | तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवाक्षेत्रातील नवोन्मेष सखोल करणे | प्रशासन अधिक सुलभ व पारदर्शक करून नागरिक व उद्योगांना विश्वासार्ह वातावरण देणे
मी कधीच पूर्ण समाधानी नसतो
भारताच्या ‘रिफॉर्म एक्सप्रेस’बाबत समाधान आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, स्वभावतः मी कधीच पूर्ण समाधानी नसतो. सार्वजनिक जीवनात सकारात्मक अस्वस्थता आवश्यक असते. मात्र, झालेल्या प्रगतीचे मोजमापही महत्त्वाचे आहे. राजकीय स्थैर्य व धोरणात्मक पूर्वानुमानक्षमतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचाही त्यांनी दावा केला.
Web Summary : PM Modi asserts 'Developed India' goal is achievable with trade agreements and reforms. He emphasizes women's key role, urging private sector investment. Focus is on structural reforms, technology, and transparent governance for a trusted environment.
Web Summary : पीएम मोदी का दावा है कि व्यापार समझौतों और सुधारों के साथ 'विकसित भारत' का लक्ष्य प्राप्त किया जा सकता है। उन्होंने महिलाओं की महत्वपूर्ण भूमिका पर जोर दिया, निजी क्षेत्र के निवेश को प्रोत्साहित किया। संरचनात्मक सुधारों, प्रौद्योगिकी और पारदर्शी शासन पर ध्यान केंद्रित किया गया है।