शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले ४१ पैकी ४१ मजूर बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 20:05 IST

सर्व मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. बचाव पथकांनी बोगद्याच्या वरून खोदकाम आणि उभ्या ड्रिलिंग केले. पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेर पडलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी सुरू आहे. उर्वरित कामगारांनाही एक एक करून बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्याच्या आत आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बाहेर काढलेल्या मजुरांची भेट घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग हेही तिथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्यात असलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे नातेवाईकही उपस्थित आहेत. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे प्राथमिक आरोग्य चेकअप बोगद्यात बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात केले जात आहे.

आधी २ रुग्णांना बाहेर काढलं; बांधकामाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी

गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आले आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या कामरांना तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय तयार ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्या कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणापासून मेन रुग्णालय ३० किलोमीटर दूर आहे. येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका तयार ठेवण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत या बोगद्यातून ४१ कामगारांना बाहेर काढले आहे. 

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड