शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘यशोभूमी’चे दरवाजे खुले; पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन, काय आहेत वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 05:48 IST

यशोभूमी द्वारका सेक्टर-२५ भूमिगत स्थानक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट जोडले जाईल.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र ‘यशोभूमी‘च्या (आयआयसीसी) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. द्वारका, दिल्ली येथे बांधलेले हे जगातील अशा प्रकारचे सर्वात मोठे केंद्र आहे. यशोभूमीमध्ये परिषदा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण परिसंस्था आहे आणि अनेक लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी तत्पूर्वी द्वारका सेक्टर-२१ ते यशोभूमी द्वारका सेक्टर-२५ पर्यंत मेट्रो लाइन विस्ताराचे उद्घाटन केले. नवीन यशोभूमी द्वारका सेक्टर-२५ भूमिगत स्थानक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट जोडले जाईल.

खर्च ५४०० कोटीसुमारे ५४०० कोटी रुपये खर्चून २१९ एकरांवर यशोभूमी (कन्व्हेन्शन सेंटर) बांधण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रगती मैदानावर असलेला ‘भारत मंडपम’ १२३ एकरवर तयार करण्यात आला आहे.

एकाच वेळी ३००० गाड्यांचे पार्किंगयशोभूमीमध्ये तयार करण्यात आलेल्या भूमिगत पार्किंगमध्ये एकाच वेळी ३००० कार पार्क करता येणार आहेत. या केंद्रात सांडपाणी पाणी पुन्हा वापरले जाऊ शकते. जलफेरभरणाचीही सोय आहे.

यशोभूमीची वैशिष्ट्ये...९.० लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधलेल्या केंद्रात १५ अधिवेशन कक्ष आहेत.आठ मजल्यांच्या केंद्राच्या छताला निळ्या रंगाची रचना आहे.यशोभूमी केंद्रामध्ये १३ बैठक खोल्या आहेत. परिषद सभागृहात ११००० पेक्षा जास्त लोक बसू शकतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी