शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महादेव ॲपचा मालक रवी उप्पल जेरबंद; लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 05:28 IST

महादेव सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी व  ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईत बुधवारी अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : महादेव सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी व  ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईत बुधवारी अटक करण्यात आली. लवकरच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या अटकेमुळे भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्या आणखी जवळ पोहोचली आहे.

रवी उप्पल हाच सौरभ चंद्राकरचा उजवा हात मानला जातो. तोच सुमारे सहा हजार कोटींच्या घोटाळ्याचा कथित मास्टरमाइंड आहे. रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. रवीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी तयार असल्याची माहिती दुबई पोलिसांनी दिली. ईडीने रायपूरच्या विशेष कोर्टाकडून या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट घेतले होते. कथित सट्टेबाजी घोटाळ्याच्या अनुषंगाने मुंबई व छत्तीसगड पोलिस तपास करीत आहेत.

४१७ कोटींची मालमत्ता जप्त 

या तपासात ईडीच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकारही आहेत. ईडीने या प्रकरणी आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये छापेमारीची कारवाई करून ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही नाव या प्रकरणात पुढे आले होते.