शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या वारशासाठी श्रेयवाद!

By admin | Updated: May 31, 2015 02:16 IST

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला.

केंद्राची विशेष समिती : डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीसाठी योजनांचा धडाकानवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वारसा हक्कावरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विविध मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती आणि त्याअनुषंगाने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत सल्ला देईल. या समितीत राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम. वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, सदानंद गौडा, रामविलास पासवान आणि सुरेश प्रभू या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आणि सिद्धान्तांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने १६ मोठे प्रकल्प राबविले जाणार असून, याची माहिती बैठकीत देण्यात आली. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे दलित समुदायाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नांतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या महत्त्वाच्या हिंदीभाषिक राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी दलित आणि महादलित समुदायाची मने जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे. भारताच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या म. गांधी, डॉ. आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा आदर्श जनतेपुढे ठेवण्यासाठी आपले सरकार काय करणार आहे, याची ढोबळ रूपरेषा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केली होती. त्यानुसार त्यांनी इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा कित्येक वर्षे भिजत पडलेला प्रश्न मार्गी लावला व गुजरातमध्ये सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची योजनाही जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.अशा आहेत विविध योजना दिल्लीत १५, जनपथ येथे सुमारे १९७ कोटी रुपये खर्चून आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र100 विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबिया आणि लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणासाठी पाठविणार14 एप्रिलला राष्ट्रीय बंधुभाव समरसता दिवस26 अलीपूर, दिल्ली येथे आंबेडकर स्मारकडॉ. आंबेडकर स्मृती टपाल तिकीट व शिक्केआंबेडकर फाउंडेशनतर्फे व्याख्यानमालाबाबासाहेबांशी महत्त्वाच्या स्थळांचा विकास