शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटले

By admin | Updated: August 8, 2014 03:14 IST

पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे.

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८  - पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे. विशेष म्हणजे पाठपुस्तक मंडळाच्या पदाधिका-यांनी याचे समर्थनही केले असून त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी या शब्दांचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
पश्चिम बंगालमधील आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात रिव्हॉल्यूशनरी टेररिझम हा धडा आहे. या धड्यात शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी या स्वातंत्रसैनिकांना जहाल आणि दहशतवादी म्हणून संबोधिले आहे. '१९०८ नंतर स्वातंत्र्यलढ्यातील काही लोकांनी दहशतवादी मार्ग स्वीकारला. त्यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ले केले. या दहशतवादी गटाचे कट समोर येऊ लागल्यावर त्याचे समाजावर परिणाम झाले. काही जण त्यांच्या विचारांशी सहमत असले तरी अनेकांना हा मार्ग रुचला नव्हता' असा उल्लेख या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. 
स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटल्याने पश्चिम बंगालमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. खुदीराम बोस, चाकी यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणणारे उद्या सुभाषचंद्र बोस यांनाही दहशतवादी म्हणतील का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणून संबोधित करुन केवळ सत्यस्थिती बदलण्यात आली नाही. तर यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला आहे असे इतिहासतज्ज्ञ अतिश दासगुप्ता यांनी सांगितले. 
राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिका-याने धड्यात दहशतवादी शब्दाचा वापर हा त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी केला आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र इतिहासातील घडामोडींविषयी शद्बप्रयोग करताना पाठ्यपुस्तक मंडळाने सावधपणे काम करायला पाहिजे असे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने याविषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. 
या घटनेनंतर पाठ्यपुस्तक मंडळाने इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारीही सुरु केल्याचे समजते. सध्याच्या इतिहासातील धडे हे काही अंशी डाव्या विचारांकडे झुकतात. अभ्यासक्रमात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या व्यक्तींवरील धडे आणण्याची गरज असल्याचे एका अधिका-याने सांगितले.