शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, आठ जवान शहीद, सातारच्या रवींद्र धनावडेंना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 06:02 IST

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही अतिरेक्यांना ठार केले आहे.अलीकडील काळातील हा काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हे तिन्ही दहशतवादी परदेशी होते, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात इतके जवान व पोलीस हुतात्मा होणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे.अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान मरण पावले, तर आॅपरेशन पूर्ण झाल्यानंतर अतिरेक्यांनी टाकलेले बॉम्ब निकामी करताना दोघांना मरण आले.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अतिरेकी पोलीस वसाहत असलेल्या भागात घुसले. त्या कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांची अनेक घरे व पोलिसांची कार्यालये आहेत. अतिसुरक्षित म्हणून ओळखला जाणारा व कडेकोट बंदोबस्त असलेला हा भाग आहे. अशा ठिकाणी हे दहशतवादी कसे घुसले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ते गोळीबार करीतच कॉम्प्लेक्समध्ये घुसले. पोलिसांच्या इमारतीतून त्यांनी बाहेरच्या दिशेने ग्रेनेडही फेकले. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व पोलीस जखमी झाले. पहाटे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सारेच काहीसे गोंधळून गेले. मात्र लगेच जवान व पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला. हे आॅपरेशन १५ तास चालले. त्यानंतर तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)चकमक संध्याकाळी संपलीत्या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही.सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.पाकच्या तीन रेंजर्सचा खात्माजम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या पडगवाल भागात गोळीबार केला. तथापि, सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाºयाने सांगितले.धनावडे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते केवळ आठ महिनेसातारा : काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना धनावडे यांना वीरमरण आले.सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले.रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. - वृत्त/३

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान