शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊमधील दहशतवादी इसिसनेच प्रेरित- पोलीस

By admin | Updated: March 8, 2017 22:40 IST

सैफुल्लासह संशयित दहशतवाद्यांचा इसिसशी संबंध नसल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी सांगितलं आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 8 - उत्तर प्रदेशात संशयित दहशतवाद्यांना पकडलं असून, लखनऊमध्ये दहशतवादी सैफुल्लाचाही एटीएसनं खात्मा केला आहे. त्यानंतर सैफुल्लासह संशयित दहशतवाद्यांचा इसिसशी संबंध नसल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती उघड केली आहे. दलजित चौधरी म्हणाले, सर्व संशयित दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यात आली होती. त्यांना बाहेरून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसचे साहित्य वाचत होते आणि त्यामुळेच ते प्रभावित झाले. आमच्याकडे त्यांचा इसिसशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र दहशतवादी हे इसिसचं साहित्य वाचत असून, त्यापासून ते प्रेरित झाले होते. तसेच ते स्वतःचं मॉड्युल बनवण्यासाठी प्रयत्नशील होते. सैफुल्लाला भाऊ आणि शेजा-यांच्या मदतीनं आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मसमर्पण करण्यास त्यानं नकार दिला. त्यानंतर आम्हाला सैफुल्लाच्या खोलीत प्रवेश करावा लागला आणि गोळीबारात तो ठार झाला. सैफुल्लाजवळ तीन पासपोर्ट सापडले आहेत. एका पासपोर्टमध्ये सैफुल्लाच्या कानपुरातल्या मनोहर नगरातला पत्ता दिला आहे. याच पत्त्यावर सैफुल्लाचं कुटुंब राहतं. संशयित दहशतवादी हे नवशिखे असल्याचं आम्ही म्हणणार नाही. यातील काही दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हे संशयित दहशतवादी इसिसचं साहित्य वाचत असून, त्यापासून त्यांनी बॉम्ब बनवण्याचा अभ्यास करत होते. लखनऊमध्ये हे चार जण गेल्या काही दिवसांपासून भाड्यानं राहत होते. तसेच इतर ठिकाणांची ते रेकीही करत होते. या दहशतवाद्यांनीच भोपाळ पॅसेंजरमध्ये आयडी बॉम्बस्फोट घडवला होता. त्यानंतर तीन संशयितांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. सैफुल्लाचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे. सैफुल्लाच्या खोलीत 32 बोअरची 8 पिस्तूल, 630 काडतुसं, 4 चाकू, कंपास, क्लाक टायमर, ड्राय सेल, पाइप, मोटारसायकल, 6 मोबाइल फोन, 4 सिम, 45 ग्रॅम सोनं, लॅपटॉप जप्त करण्यात आलं आहे. तसेच सैफुल्लाजवळ मोठ्या प्रमाणात पैसेही सापडले आहेत. त्यात विदेशी चलनाचाही समावेश आहे, अशी माहितीही उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी दिली आहे.