ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २५ - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांची सुरक्षा दलाच्या जवानांशी चकमक सुरु आहे. अद्याप या चकमकीत प्राणहानी झाल्याचे वृत्त नसले तरी या घटनेनंतर जम्मूतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यापासून ५३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नौपोरा गावात सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली होती. यादरम्यान सुरक्षा दलाचे जवान एका घराजवळ पोहोचले असता घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. यानंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढले आहे. अजूनही ही चकमक सुरु असून यात कोणीही जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेले नाही.