शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:12 IST

Perfume IED : परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादी गटांकडून परफ्यूम आयईडीचा (Perfume IED) वापर केला जाऊ शकतो, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, सीमेपलीकडून ड्रोनद्वारे परफ्यूम आयईडी देशाच्या आत पाठवण्याचा कट आहे. परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर परफ्यूम आयईडीच्या या धोक्याची गंभीर दखल घेतली जात आहे. अशा हल्ल्यांसाठी दहशतवादी मॅग्नॅटिक बॉम्बसारख्या परफ्यूम आयईडीचा वापर करू शकतात, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. दरम्यान, परफ्यूम आयईडी हा एक विशेष प्रकारचा बॉम्ब आहे, जो परफ्यूममधून दिसणार्‍या कोणत्याही बाटलीत किंवा पॅकेटमध्ये ठेवला जातो. यादरम्यान, कुणी दाबले की त्यात स्फोट होतो. 

अशा परफ्यूम आयईडीचा वापर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. सुरक्षा एजन्सींकडून एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, परफ्यूम आयईडीवजनाने खूप हलके असतात आणि अशा परिस्थितीत ते ड्रोनच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी सहजपणे हवेत सोडले जाऊ शकतात. इतकेच नाही तर असे आयईडी मेटल डिटेक्टर आणि आयईडी स्निफर डॉगच्याही पकडीत येत नाहीत. 

दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूच्या नरवालमध्ये एका दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. आरिफ नावाच्या या दहशतवाद्याकडून परफ्यूम आयईडीही जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी त्यावेळी एका मीडिया वक्तव्यात सांगितले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अशा प्रकारचा परफ्यूम आयईडी जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी