शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश, २९०० किलो स्फोटके, रसायने जप्त, गुजरातनंतर आणखी दोन डॉक्टरांना झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:03 IST

Terrorist module busted: सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार-गजवातुल-हिंद या संघटनांच्या एका आंतरराज्यीय, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतील सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या या नव्या मोहिमेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत २९०० किलो स्फोटके सापडली आहे.

श्रीनगर/ फरिदाबाद -  सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार-गजवातुल-हिंद या संघटनांच्या एका आंतरराज्यीय, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतील सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या या नव्या मोहिमेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत २९०० किलो स्फोटके सापडली आहे. गुजरातमधील रविवारची कारवाई व आता फरिदाबादेतील कारवाईनंतर आतापर्यंत तीन डॉक्टरसह ८ प्रमुख दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्यांत काश्मीरच्या डॉ. मुजम्मिल गनी आणि लखनऊच्या डॉ. शाहीन याचा समावेश आहे. हरियाणातील अल-फला विद्यापीठात प्राध्यापक असलेला मुजम्मिल श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ सुरक्षा दलांविरुद्ध पोस्टर लावल्याच्या प्रकरणात हवा होता.

मोठी कारवाई कशी झाली?गुजरात एटीएसने रविवारी डॉ. अहमद सय्यदसह तिघांना अटक केली. डॉ. गनी व डॉ. शाहीन यांना चौकशीसाठी श्रीनगर येथे आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली.

गनी व आदिल होते हँडलर? या दोघांच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडले होते. हे दोघे हँडलर असावेत, अशी शंका आहे. प्रारंभिक तपासात ते पाक म्होरक्यांच्या संपर्कात होते, असे स्पष्ट झाले आहे.

स्फोटके, शस्त्रे जप्त९०० किलो स्फोटकांत अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट व सल्फरचा समावेश असून, ३६० किलो ज्वालाग्राही पदार्थ जप्त करण्यात आले. काही रसायने, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटऱ्या, तारा, रिमोट कंट्रोल, टायमर, विशिष्ट धातूचा पत्रा जप्त करण्यात आला आहे.

सात जण काश्मिरीअटक केलेल्या आठपैकी सात जण काश्मिरी आहेत. यात आरिफ निजार डार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद डार ऊर्फ शाहिद, शोपियांचा मौलवी इरफान अहमद याच्यासह इतरांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Terror Module Busted: Explosives, Chemicals Seized; Doctors Arrested

Web Summary : A terror module linked to Jaish-e-Mohammed was exposed, leading to arrests including doctors. 2900 kg of explosives and chemicals were seized across multiple states. Investigations revealed Pakistani links and potential handler roles for some suspects.
टॅग्स :terroristदहशतवादी