शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:45 IST

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशीम मुसा हा पाकिस्तानी सैन्यात असल्याचे समोर आले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम राबवण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अली भाई आणि आदिल हुसेन थोकर यांच्यासह हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान यांची ओळख पटवण्यात आली होती. यातील दहशतवादी हाशिम मुसा याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुसाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे.

पहलगाममध्ये दहशत माजवणारा दहशतवादी हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यातील पॅरा कमांडो असल्याचे समोर आलं आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडर आहे. दहशतवादी कटाच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हाशिम मुसा सध्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या आदेशांवर काम करतो. तो एक कट्टर दहशतवादी आहे. लष्करमधल्या मास्टरमाईडनेच हाशिमला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवले होते. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर-ए-तोयबाकडे सोपवल्या संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

चौकशीदरम्यान हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली. मुसा हा फक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी नव्हता. ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबल आणि बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागेही त्याचाच हात होता. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान पहलगाममधील १५ अतिरेकी कामगारांनी याच दहशतवाद्यांना गंदरबल हल्ल्यासाठी रसद पुरवली होती. त्यानंतर आता पहलगाममध्येही मुसाने २६ नागरिकांना मारलं. पहलगामच्या इतर दहशतवाद्यांसह हाशिम मुसावर २० लाख रुपयांचे बक्षीस आहे. 

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद असल्याचे म्हटलं आहे. पहलगामपासून ६ किमी अंतरावर असलेल्या बैसरनला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर या लोकांनी अचानक गोळीबार केला होता. लष्करासारखे कपडे आणि कुर्ता-पायजमा घातलेले पाच ते सहा दहशतवादी जवळच्या घनदाट जंगलातून आले होते आणि त्यांच्याकडे एके-४७ सारख्या बंदुकीने गोळीबार केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान