शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:48 IST

जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकून गोळीबार करण्यात आला आहे.

Jammu-Kashmir : जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मछेडी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकून गोळीबार केला. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले होते, त्यातील चार जवानांना वीरमरण आले असून, इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथकेही रवाना झाली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन जात होते, यावेळी अचानक टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला या घटनेत दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, पण आता यात चार जवान शहीद झाल्याची माहिती आहे. 

राजौरी येथील लष्कराच्या तळावर हल्लारविवारी राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या अंधारात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यावेळी सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या घटनेत जवान जखमी झाला, तर अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले. 

कुलगाममध्ये दोन जवान शहीदजम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी(दि.6) भीषण चकमक झाली. या घटनेत दोन जवान शहीद झाले, तर सहा ते आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम आणि चिनिगाम गावात ही चकमक झाली होती. या चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप कुमार शहीद झाले, तर दोन ते तीन दहशतवादी ठार झाले. तर, दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली. या चकमकीत अकोल्यातील रहिवासी आणि राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार प्रदीप जंजाळ शहीद झाले, तर लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान