शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात दहशतवादी हल्ला, तीन पोलीस शहीद

By admin | Updated: May 24, 2016 04:36 IST

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सोमवारी दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या दोन ठिकाणी हल्ले केले, ज्यात तीन पोलीस शहीद झाले. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सोमवारी दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या दोन ठिकाणी हल्ले केले, ज्यात तीन पोलीस शहीद झाले. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून, भविष्यात असे आणखी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. पोलिसांवरील हल्ल्यांमुळे पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारांमुळे काश्मीर खोऱ्यात आणि श्रीनगरमध्ये पर्यटक येण्याचे टाळतील, अशी भीती ओमर अब्दुल्ला यांनीही व्यक्त केली. पहिला हल्ला सकाळी १०.४५ वाजता झादिबल भागातील मिल स्टॉप येथे झाला. दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले. असिस्टंट सब इन्स्पेक्टर गुलाम मोहम्मद व हेड कॉन्स्टेबल नाजूर अहमद अशी मृतांची नावे आहेत. हल्ल्याची दुसरी घटना तेंगपुरा येथे दुपारी १२ वाजता घडली. दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल मोहम्मद सादिक यांची गोळ्या घालून हत्या केली.हाय अलर्ट जारीजम्मू-काश्मीर राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या ३६ तासांपूर्वी हे दोन हल्ले करण्यात आल्याने संपूर्ण खोऱ्यात हाय अलर्ट जारी केला आहे. २५ मेपासून विधानसभेचे हे अधिवेशन सुरू होणार आहे. २०१३ नंतर पोलिसांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाची सर्व्हिस रायफल लुटून नेली.