शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा जगाला गंभीर धोका; ग्लोबल साउथच्या सदस्य देशांना नरेंद्र मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 06:07 IST

Narendra Modi : व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनाप्रसंगी मोदी बोलत होते.

नवी दिल्ली : जगभरातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लोबल साउथचे सदस्य असलेल्या देशांना केले. अन्नसुरक्षा, ऊर्जा संकट आणि दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करतानाच जगभरातील अनिश्चिततेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनाप्रसंगी मोदी बोलत होते. भारत सरकारने डिजिटल पद्धतीने ही परिषद आयोजित केली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने ‘सोशल इम्पॅक्ट फंड’मध्ये भारत सरकार २५ दशलक्ष डॉलर्सचे प्रारंभिक योगदान देणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

परस्पर व्यापार, व शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्लोबल साउथ किंवा विकसनशील देशांसोबत आपली क्षमता सामायिक करण्यास वचनबद्ध आहे. जी-२० परिषदेचा अध्यक्ष असताना, भारताने ग्लोबल साउथ देशांना दिलेले महत्त्व यावेळी मोदींनी अधोरेखित केले. 

एकजूट हीच आपली ताकद दहशतवाद, अतिरेकवाद, फुटीरतावादाचा आपल्या समाजाला गंभीर धोका आहे. या धोक्यासोबतच तंत्रज्ञानाचे होणारे विभाजन, तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन आर्थिक आणि सामाजिक आव्हानेदेखील निर्माण होत आहेत.मात्र, गेल्या शतकात निर्माण झालेले जागतिक प्रशासन व वित्तीय संस्था या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नाहीत.आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ग्लोबल साउथच्या देशांनी एकजूट होत एकमेकांची ताकद बनणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासोबत एकत्रितपणे आपले संकल्प पूर्ण करू शकतो. आपण सर्व एकत्र आलो, तर दोन तृतीयांश मानवतेला मान्यता मिळवून देऊ शकतो, असे व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले. 

कोरोना महामारीतून जग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही. युद्धामुळे विकासाच्या मार्गावर नवनवी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे जगावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करत असताना आरोग्य, अन्नसुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा यासंदर्भातही चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी