शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात उंदरांची दहशत, ICU मध्ये रुग्णाचे हात-पाय कुरतडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:17 IST

सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ही धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - रुग्णालयातील भोंगळ कारभाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना आता घडली आहे. तेलंगणातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावला. राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीनिवास नावाच्या एका रुग्णाचे हात-पाय उंदराने कुरतडले. त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णावर यापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि मात्र तिथे होणारा भरमसाठी खर्च उचलण्यास ते असमर्थ होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. पहिल्याच दिवशी उंदीर चावल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यांनी हे रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले, ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी पुन्हा उंदरांनी चावा घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रुग्णाचा भाऊ श्रीकांत याने सांगितले की, बेडवर रक्त पाहून मला धक्काच बसला. उंदरांनी त्याची हाताची बोटे आणि पाय कुरतडले. त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता, त्यांनी त्याला विचारले की, तुम्ही काय करत आहात. रक्ताच्या कमतरतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, यापूर्वीही अशा घटना घडल्या असून त्यांनी आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे.

निवासी वैद्यकीय अधिकारी मुरली यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय परिसरात उंदरांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलेल. एमजीएम कॅम्पसमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी शवगृहात उंदीर मृतदेह कुरतडत असल्याचं आढळून आलं होतं. आयसीयूसह संपूर्ण कॅम्पसमध्ये आता उंदरांचा धोका असल्याने रुग्ण चिंतेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Telanganaतेलंगणाhospitalहॉस्पिटल