तीन पोलीस शहीद : संसदेत पडसादजम्मू : लष्कराच्या पोषाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले. पोलिसांनीही दुपारपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. राज्यात पीडीपी-भाजपा युती सरकारने सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. या धुमश्चक्रीत सातारा जिल्ह्यातील वाईच्या सूरज मोहिते या जवानाने प्राणांची आहुती दिली, तर एका पोलीस उपाधीक्षकासह ११ जण जखमी झाले.
काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर अतिरेकी हल्ला
By admin | Updated: March 21, 2015 02:12 IST