शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गावाकडेही वाढला ताण-तणाव; ग्रामीण भागातील ४५ टक्के लोक चिंताग्रस्त असल्याचे अहवालात समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 08:46 IST

ग्रामीण भागातील तब्बल ४५ टक्के लोकांनी आम्हाला चिंतेचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले असून, १८ ते २५ वर्षे वयागटातील ४० टक्के लोकांमध्ये सध्या चिंता असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

चंद्रकांत दडस

नवी दिल्ली : मानसिक आरोग्याशी संबंधित आजार हे केवळ श्रीमंतांचे आजार म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते. मात्र, ही समस्या आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  ग्रामीण भागातील तब्बल ४५ टक्के लोकांनी आम्हाला चिंतेचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले असून, १८ ते २५ वर्षे वयागटातील ४० टक्के लोकांमध्ये सध्या चिंता असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

काय आहे अहवालात? अलीकडच्या काही वर्षांत भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण सातत्याने वाढले असून, सार्वजनिक आरोग्याची चिंता वाढली आहे. ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर चिंतेचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून येते.

उपचारासाठी कुठे जाताहेत लोक? ४२.६% प्राथमिक सुविधेचे सरकारी रुग्णालय  ५५.३% माध्यमिक सुविधेचे सरकारी रुग्णालय  ४३.८% खासगी रुग्णालये ३२.६% खासगी डॉक्टर  ५.३% नैसर्गिक उपचार करणारे १.६% भारतातील औषधे १.१% इतर 

दवाखान्यावर कुटुंबाचा खर्च किती?औषधावर मासिक खर्च - ४९३२ रुपयेमोफत मासिक औषधे - १६२८ रुपयेगंभीर आजारी रुग्णांचा खर्च - ५००० रुपये

अहवाल कसा बनला? २१ राज्ये५३८९ जणांचा सहभाग२५% महिला७५% पुरुष४९% मध्यमवर्गीय२३% अधिक उत्पन्न असणारे अहवाल :  ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया फाउंडेशन आणि डेव्हलपमेंट इंटेलिजेंस युनिटचा स्टेट ऑफ हेल्थकेअर इन रुरल इंडिया रिपोर्ट - २०२४.

घरगुती औषधांवर भर ग्रामीण भारतातील ५८ % लोक घरगुती पारंपरिक औषधांवर अवलंबून आहेत. तीनपैकी जवळपास एक व्यक्ती घरगुती/पारंपरिक औषधांचा वापर करते.

देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील ७० टक्के नागरिक हे घरगुती पारंपरिक औषधांवर अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे हे यश असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

मध्यमवर्गीयांचा औषधांवर खर्च अधिक- उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा औषधांवरील खर्च मध्यमवर्गीयांच्या तुलनेत कमी आहे. उच्च उत्पन्न असलेल्यांचा मासिक खर्च सरासरी ५,५००, मध्यमवर्गीयांचा खर्च ८,००० रुपये आहे. 

१४% महिला लैंगिक हिंसाचाराच्या बळी१८ ते ४९ वर्ष वयोगटातील ३० टक्के महिलांना वयाच्या १५ व्या वर्षापासून शारीरिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. ६ टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीय