शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा; सरकार म्हणते, परवानगी नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:19 IST

राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. 

- बलवंत तक्षक

चंडीगड : हरयाणातील नूह येथे जलअभिषेक यात्रेचे आयोजन करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही हिंदू महापंचायतीने २८ ऑगस्टला जलअभिषेक यात्रा काढणार असल्याचे स्पष्ट केल्याने तणाव वाढला आहे. यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, इंटरनेट, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी पंचकुलामध्ये सांगितले की, यात्रेला परवानगी दिलेली नाही. यात्रेत सहभागी होण्याऐवजी लोक आपापल्या भागातील मंदिरांमध्ये जलाभिषेकसाठी जाऊ शकतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. 

ते म्हणतात...परवानगीची गरज नाही- सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने २६ ते २८ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. - नूह येथील पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलाच्या २४ तुकड्यांशिवाय हरयाणा पोलिसांचे १,९०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केएमपी द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरूच राहणार आहे. - यात्रेचे आयोजन करणाऱ्या विहिंपने म्हटले आहे की, मिरवणूक काढण्यात येणार असून, अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही.

हरयाणा सुरक्षित, चिंता करू नकाहरयाणा सुरक्षित असून, कोणीही त्याची चिंता करू नये. जर राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर ती पंजाबमध्ये लावण्याची गरज आहे.     - मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री, हरयाणा  

टॅग्स :Haryanaहरयाणा