शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर

By admin | Updated: August 28, 2014 11:54 IST

अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र या घटनेमुळे अलीगढमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ऑनलाइन लोकमत

अलीगढ, दि. २८ - अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. एका हिंदूत्ववादी गटाने चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवले असून चर्चच्या आतमध्ये आता शंकराच्या मूर्तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

अलीगढमधील असरोई गावातील ग्रामस्थांनी १९९५ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या ७२ जणांनी बुधवारी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. याविषयी संघ प्रचारक आणि धर्म जागरण विवादचे प्रमुख खेम चंद्रा म्हणाले, हे धर्मांतर नसून 'घर वापसी' आहे. त्यांनी स्वेच्छेने काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता त्यांना त्यांची चूक समजल्याने त्यांनी पुह्ना हिंदू धर्म स्वीकारला आहे. या ग्रामस्थांनी हिंदू धर्म स्वीकारताच एका हिंदूत्ववादी गटाने गावातील चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच चर्चमध्ये आता शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे अलीगढमध्यी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. 

हिंदू धर्मातील जातपद्धतीला कंटाळून आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण तिथेही आमच्याकडे दुर्लक्षच झाले त्यामुळे आम्ही पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे ग्रामस्थ अनिल गौर यांनी सांगितले. ख्रिश्चन समुदायाचे धार्मिक नेते व वकिल  ओसमोंड चार्ल्स यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'घर वापसी'मागे आम्हाला षडयंत्र वाटत आहे. कधी आम्ही लव्ह जिहाद ऐकतो तर कधी घर वापसी. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहे का ? असा सवालही चार्ल्स यांनी उपस्थित केला आहे.