शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...खरं-खरं सांगा, कसं वाटेल?"; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारासंदर्भातील धीरेंद्र शास्त्रींचे शब्द मन हेलावून टाकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:36 IST

"जरा विचार करा, ज्या देशात तुम्ही वर्षानुवर्षे राहिलात, व्यवसाय केला, एक एक पैसा जमवून वाचवून घर, दुकान बांधले आणि 20 लोकांनी येऊन लुटून नेले, तर खरे सांगायला कसे वाटेल? तुमची मुलगी, जिला तुम्ही फुलासारखं वाढवलं, अतिशय कोमल मुलगी, एक क्रूर राक्षस वासनेपोटी तिच्यावर क्रूरपणे बलात्कार करतो, खरं खरं सांगा कसं वाटेल?"

आपल्या बिनधास्त शैलीमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नोव्हेंबरमध्ये बागेश्वर धाम ते ओरछा अशी 160 किलोमीटरची 'हिंदू जोडो यात्रा' करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ही पदयात्रा जात-पात आणि अस्पृश्यतेच्या विरोधात असेल. दरम्यान, त्यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीतील एक क्लिप जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ते बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचारासंदर्भात जे काही बोलत आहेत, ते अक्षरश: हेलावून टाकणारे आणि डोळ्यात पाणी आणणारे आहे.  शास्त्रींच्या पॉडकास्टची ही क्लिप केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही शेअर केली आहे.

बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्या सत्तापालटानंतर हिंदूंसाठी निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा संदर्भ देताना धीरेंद्र शास्त्री यांनी भारतातील हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "ज्या बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळली गेली ते भारतातील हिंदूंना विचारत आहेत, तुम्ही काही तयारी केली आहे का? की तुम्हीही असेच जाळून जाल?

दरम्यान अँकरने धीरेंद्र शास्त्री यांना विचारले की, असेच बांगलादेशात हिंदूंसोबत काय सुरू होतं? याचा आम्हाला काही फरक पडला नाही. यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "एक दिवस आम्ही बांगलादेशवर विचार करत होतो, जर आपल्या बहिणीला अथवा मुलीला आपल्या समोरच कुणी उचलून नेलं, तर कसं वाटेल? जरा विचार करा, ज्या देशात तुम्ही वर्षानुवर्षे राहिलात, व्यवसाय केला, एक एक पैसा जमवून वाचवून घर, दुकान बांधले आणि 20 लोकांनी येऊन लुटून नेले, तर खरे सांगायला कसे वाटेल? तुमची मुलगी, जिला तुम्ही फुलासारखं वाढवलं, अतिशय कोमल मुलगी, एक क्रूर राक्षस वासनेपोटी तिच्यावर क्रूरपणे बलात्कार करतो, खरं खरं सांगा कसं वाटेल?"

ते पुढे म्हणाले, "ज्या सन्मानासाठी तुझ्या पूर्वजांनी प्राणांची आहुती दिली, रामायणासाठी, रामासाठी, गीतेसाठी, कृष्णासाठी... त्याच देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती विटंबना करून फेकली गेली, खरं सांगा असं वाटेल? तुम्ही ज्या देशात राहता, त्याच देशात तुमच्यावर अल्पसंख्यक देश सोडा म्हणून ओरडले जाते, उलट, तुमच्या पूर्वजांनीही ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, बांगलादेशासाठी बलिदान दिले आणि त्या देशाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच देशात तुम्हाला शिवीगाळ करून म्हटले गेले की, देश सोडा, बांगलादेश सोडा, हिंदूंनो देश सोडा, तर तिथे तुमच्या आजोबांच्या आठवणी, तुमच्या आजीच्या आठवणी, तुमच्या वडिलांच्या आठवणी, ते दरवाजे, ते अंगण. ते घर, ती दाराची चौकट, ती आंब्याचं झाडं, ती लिंबाची झाडं... खरं सांग कसं वाटेल? 

तुमचे घर जाळले गेले, तुमच्या स्वप्नातील संपत्तीला जाळून खाक केली गेली, खरं सांगा कसं वाटेल?" असे म्हणत, धीरेंद्र शास्त्री यांनी बांगलादेशात जे काही घडले, त्यापासून भारतीय हिंदूंनी धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. याच बरोबर त्यांनी हिंदूंमधील पुटीवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "पण हे या भारताचे दुर्दैव आहे की, भारतातील हिंदू असा विचार करू शकत आहे, ना जागृत होऊ शकत आहे. आपण एकटे काय करणार? एक दिवस असा येईल की ते आपल्यालाही संपवतील. कोणत्यातरी कटात अडकवतील. बघा, एखाद्या प्रकरणात अडकवतील. ठीक आहे, आज तर आम्ही आहोत, समजा आम्ही जीवंत जरी राहिलो, पण तुम्ही जागृत झाला नाहीत, तर खरं खरं सांगा, आम्ही एकटे काय करणार? असा सवालही धीरेंद्र शास्त्री यांनी देशातील हिंदूंना केला.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामBangladeshबांगलादेशHinduहिंदू