शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:08 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते उद्घाटन, २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली.

हैदराबाद - ‘लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण सरकारी यंत्रणेने भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या आदर्शांना साकार करण्यासाठी काम करावे, या उद्देशाने तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येथे रविवारी सांगितले. २६५ फूट उंच आणि २८ एकर जागेत १०,५१,६७६ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन सचिवालय संकुलाचे उद्घाटन राव यांनी केले. 

तेलंगणा आंदोलनादरम्यान आलेल्या अनेक अडचणींचा तसेच नवे सचिवालय बांधताना झालेल्या विरोधाचा उल्लेखही मुख्यमंत्री राव यांनी यावेळी केला. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून राज्य सचिवालय बांधले आणि ते देशातील सर्वोत्कृष्ट सचिवालयांपैकी एक असल्याचेही राव म्हणाले. 

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली. तेलंगणा राज्य हे देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक शक्ती बनले आहे. राज्यातील सर्व जलसाठे पुनरुज्जीवित झाले असून भर उन्हाळ्यातही तलाव पाण्याने भरलेले आहेत. याला म्हणतात राज्याची पुनर्रचना आणि सर्व राजकीय विरोधकांनी डोळे उघडून राज्यातील हा विकास पहावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

आज तेलंगणात जगातील सर्वात मोठा कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प बांधला आहे, जो अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. धरणांमुळे जलस्रोत पुनर्संचयित करण्यास मदत झाली आहे. देशातील ८४ लाख एकर भातशेतीपैकी एकट्या तेलंगणात  ५६ लाख एकर क्षेत्रात लागवड झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

तेलंगणात २४ तास वीजआज तेलंगणात विजेचे संकट नाही. चोवीस तास सर्व क्षेत्रांना पुरवठा केला जातो. शेतकरी स्वाभिमानाने जगत आहेत आणि हा तेलंगणाच्या पुनर्रचनेचा परिणाम आहे. गावे आणि शहरांची वाढ अभूतपूर्व आहे. तेलंगणाने केंद्र शासनातर्फे दिले जाणारे विक्रमी पंचायत पुरस्कार पटकावले आहेत, असे राव म्हणाले.

टॅग्स :Telanganaतेलंगणा