शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

शेतीसुधारणांमध्ये तेलंगणाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:15 IST

एक काळ असा होता की तेलंगणा या राज्याचा उल्लेख झाला की समोर चित्र यायचे ते म्हणजे संकटात सापडलेला शेतकरी. अनेक समस्यांनी पिचलेला शेतकरी अखेर

मोहना कुमारीहैदराबाद : एक काळ असा होता की तेलंगणा या राज्याचा उल्लेख झाला की समोर चित्र यायचे ते म्हणजे संकटात सापडलेला शेतकरी. अनेक समस्यांनी पिचलेला शेतकरी अखेर आत्महत्या करून आपले आयुष्य संपवायचा. शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात महाराष्ट्रात सगळ््यात जास्त असायचा. त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक लागत असे. परंतु आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तेलंगणाच्या सर्व ३१ जिल्ह्यांमध्ये आज एकही शेतकरी आत्महत्या होत नाही. किंबहुना भरघोस शेती उत्पादनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला अधिक गती मिळताना दिसत आहे. मागच्या चार वर्षात सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदललेला दिसतो. आज इतर कोणत्याही राज्यातील शेतकऱ्याला हेवा वाटावा इतक्या चांगल्या स्थितीत तेलंगणामधील शेतकरी सन्मानाने जगताना दिसतो आहे.या बदलाचे सारे श्रेय खºया अर्थाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना जाते. ते स्वत: शेतकरी आहेत. त्यांना शेतकºयांच्या अडचणींची पुरती जाण आहे. त्यांना ठाऊक होते की, इथे मूळ समस्या आहे ती म्हणजे शेतीसाठी भूजलावर असलेले अवलंबित्व. सिंचनाचे अन्य कोणते पर्याय नसल्याने शेतकरी हतबल असायचा. शेतकरी कमालीच्या नैराश्याने ग्रासलेले असायचे. त्याचे कुटुंबीय, समाज आणि प्रशासनाच्या हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असायचा. खचलेल्या शेतकºयाने तोवर मृत्यूला कवटाळलेले असायचे. गेली अनेक दशके ही स्थिती कायम होती.हे बदलून टाकण्यासाठी मुख्यमंत्री राव यांनी पहिल्यांदा शेतकरी हिताच्या ५० विविध योजना सुरु केल्या. गांजलेल्या शेतकºयांच्या समस्यांची तड लावण्यासाठी अनेक स्तरावर विविध उपाययोजना आखल्या. शेती उत्पादनाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे राज्याचे रब्बीतील भाताचे उत्पादन ४० लाख टनांवर पोहचले आहे. शेतकºयांचे दु:स्वप्न संपले आहे.नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात सरकारने शेतकºयांना प्रत्येक एकरामागे चार हजार रुपयांचा सहाय्यता निधी दिला आहे. ‘रायतू बंधू’ या योजनेच्या अंतर्गत ही मदत शेतकºयाच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. या विशेष योजनेवर सरकारने १२ हजार कोटी खर्च केले आहेत. येत्या आॅक्टोबरमध्ये रबी हंगामात शेतकºयांच्या खात्यांवर अशाचप्रकारे पुढचा हफ्ताही जमा होणार आहे. अर्थतज्ज्ञ किंवा राज्याच्या शेतीला प्राधान्य देण्याच्या धोरणावर टीका करणाºयांना हा निर्णय लोकानुनय वाटू शकतो.शेतकºयांसाठी प्राणवायूपरंतु हा सहाय्यता निधी शेतकºयांना खºया अर्थाने प्राणवायू ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सहाय्यता निधीमुळे शेतकºयांची सावकार तसेच इतर खासगी कर्ज देणाºयांच्या तावडीतून कायमची सुटका झाली आहे. कर्जाची वसुली करताना हे सावकार जबरदस्तीने वागत, त्यांचा क्रूर छळ करीत. सरकारकडून मिळणाºया सहाय्यता निधीमुळे आज शेतकरी बियाणे, लागणारी औषधे, खते तसेच इतर गरजेच्या वस्तू पेरणीच्यावेळीच खरेदी करू शकतो.शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा आणि शेतकºयांनी दिलेली एक लाखांपर्यंतची कर्जमाफी या निर्णयामुळे शेतकºयांना मोठा लाभ झाला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर १७ हजार कोटींचा बोजा पडला हे जरी खरे असले तरी यामुळे तेलंगणाची देशात ओळख शेतकºयांच्या हिताला अनुकूल सरकार अशी बनली आहे हे सुद्धा नाकारता येत नाही.नीति आयोगाच्या ‘अ‍ॅग्रीकल्चर मार्के टिंग अ‍ॅण्ड फार्मर फेंडली रिफॉर्म्स इंडेक्स’मध्ये तेलंगणाने पहिल्या १० राज्यांमध्ये स्थान पटकावले आहे. या तालिकेत ५४.३% गुण मिळवून तेलंगणा नवव्या स्थानी आहे. ही इंडेक्स काढताना प्रामुख्याने कृषीउत्पन्न बाजार समित्या, जमीनी, खासगी जमीनीवरील वनीकरण, वृक्षांची लागवड आदिंमध्ये केलेल्या सुधारणांचा विचार केला जातो.शेतीसाठी सर्वाधिक तरतूदतेलंगणा सरकारने अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासात आजवर पहिल्यांदा सिंचन, वीजेवरील अनुदान आणि शेतीवर सर्वाधिक आर्थिक तरतूद केली आहे. या तिन्ही क्षेत्रांना मिळून एकूण अर्थ संकल्पाच्या २६% निधी देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री इताला राजेंदर यांनी दिली.अर्थसंकल्पात शेतीला सर्वाेच्च प्राधान्य देत प्रत्येक बाबींचा अत्यंत बारकाईने विचार करण्यात आला आहे. सिंचनासाठी सरकारने कालेस्वरम प्रकल्प मल्लान्नासागर आणि मिड-मनेरशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. गोदावरी नदीवरील ८४,५०० कोटींच्या कालेस्वरम प्रकल्पामुळे तेलंगणाच्या १३ जिल्ह्यातील १८.२६ लाख एकर अधिक जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच सध्याच्या १८.८२ लाख एकर जमिनीलाही स्थिर सिंचन मिळणार आहे. तोंडावर असलेल्या खरीप हंगामात सिंचनासाठी खूप लाभदायक ठरणार असल्याने या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. तेलंगणातील शेतकºयांना यातून खूप मोठा दिलाला मिळणार आहे. यामुळे राज्याचे शेती उत्पादनही कमालीचे वाढणार आहे. राज्याचे एकूण शेती उत्पादन सध्या १०१ लाख टन इतके आहे.मी स्वत: शेतकरी आहे. मला त्यांच्या वेदना, दु:ख ठाऊक आहे. शेतीमध्ये येणाºया अडचणींची जाण आहे. त्यामुळेच बियाणे पेरण्यापासून आलेले पिक बाजारात विकले जाईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते.- के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्रीशेतीसाठी देशातील सर्वाधिक तरतूद१. शेतकºयांना मोफतवीज. २०१७-२०१८ मध्ये ४,४८५ कोटींचा खर्च२. मोफत विजेपोटी२०१८-१९ सालासाठी३,७२८ कोटींची तरतूद३. ‘रायतू बंधू’ शेतकºयांना प्रति एकरी ४ हजार रुपयांचा सहाय्यता निधी. १२ हजार कोटींची योजना४. २०१८-१९ च्या अर्थ संकल्पात शेती आणि संबंधित क्षेत्रे तसेच ग्रामीण विकासासाठी२०,८२० कोटींची तरतूद५. शेतकºयांना योग्यहमीभाव मिळावा यासाठी५०० कोटींची निधी६. शेती यांत्रिकीकरणासाठी५२२ कोटींची निधी७. प्रत्येक शेतकºयापर्यंत शेती विम्याच्या विस्तारासाठी५०० कोटींचा निधी८. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी१७ हजार कोटी